Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांची भारताकडे पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी हाक

Share

नवी दिल्ली- भारताचा 73 वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. सर्व भारतीय बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी यावेळी भारताकडे कार्यकर्त्यांनी केली आहे. बलुचिस्तान पाकिस्तानचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केली आहे.

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील एक प्रांत असून हिंसाचारामुळे चर्चेत आहे. फाळणीपासून म्हणजेच 1947 पासूनच बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी जनतेतून केली जात आहे. 11 ऑगस्टला 1947 रोजी आम्हाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, गुरूवारी भारताच्या 73 स्वातंत्र्य दिनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरणार्‍या कार्यकर्त्यांनी भारतातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही भारताशी जोडले गेलेलो असून पाकिस्तानच्या जोखडातून बलुचिस्तानला स्वतंत्र करायचे आहे. त्यामुळे भारताने मदत करावी, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!