‘बळीराजाची सनद’ शासनाला

0

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदने

कोपरगाव (प्रतिनिधी) – राज्यातील शेतकरी 1 जूनपासून संपावर गेले आहेत. कृषिप्रधान अशी बिरुदावली मिरविणार्‍या आपल्या देशाला व राज्याला शेतकरी संपावर जाणे हे भूषणावह नाही. शासनाने शेतकर्‍यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाकडे व शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून शेतकर्‍यांच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या 18 व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनाला शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन ‘बळीराजाची सनद’ शासनाला देण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. शासनाच्या वतीने कोपरगावचे नायब तहसीलदार सुसरे यांनी कोपरगाव तालुक्यातील 14 हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलली सनद स्वीकारली.
यावेळी सभापती अनुसयाताई होन, उपसभापती अनिल कदम, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संदीप वर्पे, उपजिल्हाध्यक्ष दीपक साळुंके, जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते, सौ. विमलताई आगवन, सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, अर्जुनराव काळे, श्रावण आसने, पूर्णिमा जगधने, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगुले, युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, वर्षा कहार, माधवी वाकचौरे, सैदाबी शेख, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष कृष्णा आढाव आदी उपस्थित होते.

‘बळीराजाची सनद’ मधील मागण्या
शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांचा 7/12 कोरा करावा, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकर्‍यांसाठी दिवसा वीजपुरवठा करून किफायतशीर व सवलतीच्या दरात वीज द्यावी. बी-बयाणे, खते व औषधे यांचा पुरवठा शासनामार्फत शेतकर्‍यांना त्यांच्या बांधावर उपलब्ध करून द्यावेा अल्पभूधारक शेतकर्‍यांना किमान 3 लाख रूपयांपर्यंतचे कर्ज हे सरसकट शून्य टक्के व्याजदराने द्यावे. शेतकर्‍यांच्या मुलांसाठी उच्चशिक्षणाची व सर्व शिक्षणासाठीच्या प्रवासाची मोफत सोय करावी, शेतीबरोबरच पूरक जोडधंदे तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व मस्यव्यवसाय यासाठी विशेष योजना तयार करून शेतकर्‍यांच्या उत्पन्नाला हातभार लावावा, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला उभारी देण्यासाठी विशेष योजना तयार करून अशा कुटुंबाची सर्व जबाबदारी शासनाने घ्यावी, शेतमालाला आधारभूत किमतीच्या दीडपट भाव देऊन त्यांचा माल शासनाने खरेदी करून वेळेवर त्याचे पैसे द्यावेत, नैसर्गिक संकटातून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी, ठिबक व तुषार सिंचनाचे प्रोत्साहनपर अनुदान देऊन प्रलंबित अनुदान त्वरित उपलब्ध करून द्यावे, शेततळयासाठी देण्यात येणार्‍या अनुदानात वाढ करून ते एक लाख रूपये करावे, 60 वर्षांवरील शेतकर्‍यांना पेन्शन योजना सुरू करावी.

श्रीरामपूर-राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वर्धपान दिनानिमित्त महाराष्ट्रातील शेतकर्‍याच्या मागण्यांबाबत पक्षाने शेतकर्‍याचे आंदोलन सुरु केले आहे .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्राताधिकारी कार्यालयवर जाऊन मागण्याचे निवेदन पूरवठा विभागाच्या आव्वल कारकुन दीप्ती वाघ यांना दिले.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी प्राताधिकारी कार्यालयात जाऊन बळीराजांची सनद हे मागण्यांचे निवेदन अव्वल कारकून दीप्ती वाघ यांना देण्यात आले. तर सकाळी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचा वर्धपानदिन साजरा केला.
तहसील कार्यालयात बळीराजाची सनद देतेवेळी अर्चना पानसरे, सुभाष राजळे, सुभाष आदिक, राजेद्र पवार, भाऊ डाकले, कारभारी बडाख, डॉ.बापू आदिक, अविनाश जगताप, डॉ. विलास आढाव, रामभाऊ औताडे, उत्तमराव पवार, मुरलीधर ठोबर, अरुण ठणगे, पी. आर. शिंदे, अल्तमेश पटेल, सुरेश पाचपिंडे, रघुनाथ मुठे, अण्णा पंतगे, राजू शेट्टी, अशोक भागवत, मारुती औताडे, विराज भोसले, भाकचंद औताडे, उत्तमराव आसने, प्रशांत खंडागळे, निखील सानप, बापुसाहेब करंडे, कैलास भागवत, दिलीप नाईक, एकनाथ तांबे, नंदू चोरमल, वंसतराव पवार, कैलास बोर्डे, सरवर अली सय्यद , विजयराव खाजेकर, अनिल लबडे, उमेश राऊत आदी सहभागी झाले होते.

शेवगाव तालुका राष्ट्रवादीच्यावतीने बळीराजाची सनद नायब तहसीलदार ज्ञानेश्‍वर धाडगे यांना देताना पं. स. सभापती क्षितिज घुले, दिलीप लांडे, अरुण लांडे, संजय कोळगे आदी.

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त तालुका राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी बळीराजाची सनद असलेल्या 13 मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ज्ञानेश्वर धाडगे यांना दिले.
सनद देण्यासाठी दिलीप लांडे, अरुण लांडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, कृषिउत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय फडके, संजय कोळगे, माजी उपसभापती अंबादास कळमकर, बबनराव भुसारी, ताहेर पटेल, राजेंद्र वाणी, डॉ. मेधा कांबळे, मीनाताई कळकुंबे उपस्थित होते.

तहसीलदारांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 18 व्या वर्धापन दिना निमित्त शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी तालुक्यातील विविध गावांतील 10 हजार शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन व बळीराजाची सनद या नावे विविध मागण्या असणारी फाईल आमदार राहुल जगताप व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नायब तहसीलदार सीताराम आल्हाट यांना देण्यात आली.
यावेळी प्रा. तुकाराम दरेकर, हरिदास शिर्के, अख्तर शेख, महेंद्र वाखारे, अतुल लोखंडे, विश्वास थोरात, कल्याण जगताप, भास्कर वागस्कर, ऋषीकेश गायकवाड, उगले, विवेक पवार, सुदाम नवले, प्रदीप औटी, भाऊसाहेब खेतमाळीस, फक्कड मोटे, दादासाहेब औटी, विशाल लगड, सोनू कोथिंबिरे, विजय खेतमाळीस, दीपक ननवरे, सोमनाथ डुबल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राहुरीचे तहसीलदार अनिल दौंडे यांना बळीराजा सनद देण्यात आली.

राहुरी स्टेशन (वार्ताहर)- राहुरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस समितीच्यावतीने जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव गाडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार अनिल दौंडे यांना शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांची ‘बळीराजा सनद’ देण्यात आली.
याप्रसंगी शिवाजीराव गाडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय कातोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा निर्मलाताई मालपाणी, उपसभापती रवींद्र आढाव, सुरेश निमसे, पंचायत समिती सदस्य प्रदीप पवार, संजय पोटे, विलास तनपुरे, जयंत सुपेकर, शहर युवकाध्यक्ष वसीम सय्यद, मुळा-प्रवराचे संचालक शिवाजी सागर, नितीन म्हसे, मच्छिंद्र सोनवणे, अशोक कदम, अण्णासाहेब बाचकर, बाळासाहेब उंडे, डॉ. राजेंद्र बानकर, उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना आ. संग्राम जगताप, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, माणिकराव विधाते, अविनाश आदिक, रेश्मा आठरे, अभिजीत खोसे व इतर.

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यात संपावर असणार्‍या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकर्‍यांच्या मागण्यांची बळीराजाची सनद निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आली.
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, दादाभाऊ कळमकर, अविनाश आदिक, प्रा. माणिकराव विधाते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अभिषेक कळमकर, काकासाहेब नरवडे, अभिजित खोसे, रेश्मा आठरे, सोमनाथ धूत, किसनराव लोटके, हनीफ जरीवाला, वैभव ढाकणे, गजानन भांडवलकर, संजय सपकाळ, विपुल शेटिया, प्रकाश भागानगरे, संभाजी पवार, अमृता कोळपकर आदी उपस्थित होते.

पाथर्डीत निवेदन देतांना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते.

पाथर्डी (प्रतिनिधी) –  तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तहसीलदारांना बळीराजाच्या मागण्यांची सनद देण्यात आली. निवेदनावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, बाजार समिती सभापती गहिनीनाथ शिरसाठ, उद्योगपती किरण शेटे, नगरसेवक बंडू बोरुडे, महेश बोरुडे, नगरसेविका आशिया मणियार, सविता डोमकावळे, सविता भापकर, माधुरी आंधळे, सीताराम बोरुडे, माजी नगरसेवक चांद मणियार, बाजार समितीचे संचालक बाळासाहेब घुले, बाळासाहेब दराडे, अजित चौनापुरे, रोहित रणखांब आदींच्या सह्या आहेत. तहसीदारांचे प्रतिनिधी म्हणून रेकॉर्ड विभागाचे प्रमुख बी. एस. जाधव यांनी निवेदन स्वीकारले.

अकोलेत निवेदन देताना आ. वैभव पिचड व इतर.

अकोले (प्रतिनिधी) – अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना बळीराजाची सनद देण्यात आली. यावेळी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम  समितीचे सभापती कैलास वाकचौरे, नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, तालुकाध्यक्ष गिरजाजी जाधव, महिला तालुकाध्यक्षा चंद्रकला धुमाळ, मधुकर नवले, जे. डी. आंबरे, यशवंत आभाळे, मीनानाथ पांडे, भाऊ पाटील नवले, बाजार समितीचे सभापती परबत नाईकवाडी, अंजना बोंबले, कल्पना सुरपुरिया, युवक तालुका अध्यक्ष शंभू नेहे, सुरेश गडाख, सुनील दातीर, राजेंद्र डावरे, सुधीर शेळके, दिलावर शेख, आनंद वाकचौरे, विक्रम नवले, उपनगराध्यक्ष प्रकाश नाईकवाडी, नगरसेवक सचिन शेटे, नामदेव पिचड, परशराम शेळके, बाळासाहेब वडजे, राहुल देशमुख, नीलेश चौधरी, शैलेश देशमुख, रवींद्र देशमुख, राहुल शहा, सोपान देशमुख, मनोज गायकवाड, विजय पवार, बाबासाहेब  आभाळे, दत्तात्रय भोईर, माधवी जगधने, सीताबाई गोंदके, शीतल तिकांडे, कविराज भांगरे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*