Type to search

Featured नाशिक

बाळासाहेब वाघ यांना कृषी जीवन गाैरव पुरस्कार जाहीर

Share

नाशिक :

माजी विद्यार्थी संघटना, कृषी महाविद्यालय, पुणे यांच्यातर्फे के के वाघ शिक्षण, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचा कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या स्थापना दिनानिमित्त शनिवार, दिनांक 1 फेब्रवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता डाॅ. शिरनामे हाॅल, पुणे येथे कृषी जीवन गाैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हा सत्कार सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे कृषी राज्य मंत्री डाॅ. विश्वनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तसेच यावेळी कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, शास्रज्ञ व सनदी आदी मान्यवर उपस्थित असणार आहे. बाळासाहेब वाघ यांनी शासकीय कृषि महाविद्यालय पुणे येथे सन 1954 ते 1958 या काळात बी.एस्सी.(अ‍ॅग्री.) ही पदवी संपादीत केली आहे.

सन 1972 ते 1979, 1984 ते 1995 व 2002 ते 2006 अशा विविध कालखंडामध्ये अर्थात तब्बल 22 वर्षे कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखानचे अध्यक्षपद भूषविले आहे. त्यानंतर नाशिक येथे के के वाघ शिक्षण, काकासाहेब नगर येथे निफाड तालुका ग्राहक मंडळ, ग्राहक सहकारी संस्था, फळ व भाजीपाला संघ, मेडिकल ट्रस्ट अशा अनेक विविध कृषि आणि सामाजिक संस्थांच्या स्थापनेत महत्वाचे योगदान दिले. महत्त्वाचे म्हणजे निफाड तहसील कार्यक्षेत्रात 250 कर्मवीर बंधारे बांधले.

या योगदानामुळे निफाड तालुक्यातील शेतकरी सुजलाम-सुफलाम झाला आहे. तसेच महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या महाराष्ट्र जलसिंचन आयाेगात ‘सदस्य’ म्हणून केलेल कार्यामुळे महाराष्ट्राच जलव्यवस्थापनाला मिळालेली नवी दिशा व नवी गती मिळाली आहे. या सा-या शैक्षणिक, कृषी व सामाजिक कार्याचा गाैरव करण्यासाठी बाळासाहेब वाघ यांना कृषी जीवन गाैरव पुरस्कार जाहिर झाला.बाळासाहेब वाघ यांना कृषी जीवन गाैरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!