Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शाश्वत विकासातील सातत्यासाठी विक्रमी मताधिक्याने विजयी करा – आ. थोरात

Share

संगमनेर (प्रतिनिधी)- भाजपा-सेना सरकार वाढती बेरोजगारी, बंद पडणारी कारखानदारी, फसलेली कर्जमाफी यावर उत्तरे देत नाही. ते केवळ फक्त फसवी जाहिरात बाजी व भाषणबाजी करतात त्यांचा पराभव आता अटळ असून संगमनेरचा लौकिक व शाश्वत विकासाचे सातत्य राखण्यासाठी विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर शहरात विराट समर्थन रॅलीच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी समवेत आ. डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, सत्यजीत तांबे, उद्योगपती राजेश मालपाणी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, सुधाकर रोहम, कपील पवार, प्रशांत वामन, वसीम शेख, अ‍ॅड. माधवराव कानवडे, रामदास वाघ, बाबा ओहोळ, विश्वासराव मुर्तडक, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, हिरालाल पगडाल, अर्चनाताई बालोडे, निर्मलाताई गुंजाळ, शरयुताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात, सविता पारीख, डॉ. मैथीली तांबे, आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. डॉ. सुधीर तांबे म्हणाले, संगमनेर हे विकासाचे मॉडेल आहे. भाजप-सेनेच्या भूलथापांना बळी पडू नका. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ माणसाची विनाकारण ईडीची चौकशी लावून अपमान केल्याने संपूर्ण महाराष्ट्र पेटला. आता भाजप हारले असून सर्वांनी एकजुटीने आ. थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

सत्यजीत तांबे म्हणाले, मोदी लाटेवर निवडून आलेल्या उत्तरेच्या खासदारांना संगमनेरकर खासदार मानतच नाही. सत्तेची हाव लागलेली ही मंडळी असून पूरग्रस्तांना खर्‍या मदतीऐवजी फक्त फोटोसाठी पुढे असतात. डॉ. सुजय विखे यांनी आ. बाळासाहेब थोरात यांचा फोटो घरात लावावा. कारण आता घराघरात बाळासाहेब थोरात आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आबासाहेब थोरात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर काही पक्ष राजकारण करत आहे.

महाराज हे संपूर्ण देशाचे आहे. सुधाकर रोहम म्हणाले, आदिवासी दलित बांधव, मागासवर्गीय बांधव आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी उभे आहे. यावेळी हिरालाल पगडाल यांनीही सरकारवर हल्लाबोल चढविला. यावेळी भाऊसाहेब कुटे, अशोक भुतडा, संपतराव म्हस्के, निलेश जाजू, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, निखील पापडेजा, सोमेश्वर दिवटे, आनंद वर्पे, सुभाष सांगळे, लहानभाऊ गुंजाळ आदींसह तालुक्यातील विविध पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीचे स्वागत शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी केले. नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले तर बाजीराव खेमनर यांनी तालुक्यातील उपस्थित जनतेचे आभार मानले.

उद्योग सहकार आघाडीचा पाठिंबा
आमदार बाळासाहेब थोरात यांचे विकासाचे काम, जनमानसात सन्मान व संगमनेर तालुक्याचे एकमत यामुळे तालुक्याची अस्मिता व राज्यात गौरव विकासासाठी आपण आमदार बाळासाहेब थोरात यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे उद्योग सहकार आघाडीचे शहर प्रमुख श्रीकांत तवरेज यांनी जाहीर करुन पाठिंबा दिला.

अभूतपूर्व रॅली
संगमनेर शहरात आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ सुमारे 40 ते 50 हजार युवकांनी भव्य जल्लोष करत समर्थन रॅली काढली. ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पावसाची रिमझीम व आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गीताच्या ठेक्यावर संगमनेर शहर गर्दीने फुलून गेले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!