Type to search

Breaking News मुख्य बातम्या सार्वमत

काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी बाळासाहेब थोरात यांची निवड

Share

मुंबई | प्रतिनिधी

कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचेच कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे. विधानसभेच्या गटनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम संपल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकला होता. त्यातच विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेसने पक्षांतर्गत फेरबदल करत बाळासाहेब थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी नुकत्याच नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये आमदार नसीम खान यांच्याकडे विधानसभा उपनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर बसवराज पाटील मुख्य प्रतोदपदी तर के.सी. पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची विधानसभेच्या प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

यासोबतच शरद रणपिसे यांची विधान परिषदेच्या गटनेतेपदी तर उपनेतेपदी रामहरी रुपनवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  विधान परिषदेच्या प्रतोदपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!