Type to search

Breaking News maharashtra सार्वमत

थोरात-विखेंचे विमान प्रवासात हम साथ है!

Share

एकत्र दिल्ली प्रवासाची जोरदार चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी) – काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात आणि भाजपाचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी शिर्डी ते दिल्ली प्रवास एकाच विमानाने केला. विमान प्रवासात एकमेकांच्या शेजारी बसून राजकारणापलिकडे ‘हम साथ साथ है’ असा संदेश देणारे हे राजकारण नेमके आहे तरी काय, याची दिवसभर चर्चा झाली.

सोमवारी सकाळी साडेदहा वाजता शिर्डी विमानतळावरून दिल्लीकडे जाणारे विमान झेपावले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर दिल्लीत नेत्यांच्या भेटीला निघालेले आ.थोरात आणि दिल्लीतील कामांसाठी खा.डॉ.सुजय विखे योगायोगाने एकाच विमानाने प्रवास करत असल्याने गाठ पडली. दोघे शेजारीच बसले. त्यामुळे विमानात त्यांना ओळखणार्‍यांच्या भुवया उंचावल्या.

एकाने तातडीने मोबाईलमध्ये छायाचित्रही टिपले. प्रारंभी दोघांची काहीशी अवघडल्यासारखी स्थिती झाली होती. दोघांमध्ये काय चर्चा झाली, याचा खुलासा मात्र झाला नाही. या प्रवासाने राजकीय वर्तुळाला चर्चेचे खाद्य मात्र पुरवले. दिवसभर ही घटना आणि विमानातील छायाचित्र व्हायरल झाले.

थोरात आणि विखे राजकारणात एकमेकांचे कट्टर आणि पारंपारिक विरोधक म्हणून ओळखले जातात. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात आरोपांची राळ उडवली होती. दोघांचा संघर्ष सध्या टोकाला आहे. त्यामुळे त्यांचा ‘योगायोगा’ने घडलेला विमानप्रवास चर्चेचा ठरला. त्यावरून विविध तर्क काढले जात आहेत. मात्र प्रवास म्हणजे योगायोग होता. राजकीय वाद म्हणजे वैयक्तिक वैर नव्हे, अशी प्रतिक्रीया एका कार्यकर्त्याने व्यक्त केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!