Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या सार्वमत

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ

Share

मुंबई- आज दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे
यांनी शपथ घेतली. त्यांच्या मंत्रीमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाविकासआघाडीमध्ये बाळासाहेब थोरातांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या काळात थोरातांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे विश्वासू आहे. दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना राजी करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.

बाळासाहेब थोरातांचा परिचय
बाळासाहेब थोरात हे पुणे विद्यापीठातून बीए झाले असून, पुण्यातील इंडियन लॉ सोसायटीच्या विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. बाळासाहेब थोरात, पत्नी कांचन, मुलगी डॉक्टर जयश्री, मुलगा राजवर्धन असे त्यांचे कुटुंब आहे. थोरात हे संगमनेरमधील जोर्वे येथील रहिवासी  आहेत. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

1985 पासून सलग 2014 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकीत गेली 30 वर्षे संगमनेर मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. बाळासाहेब थोरात 2009 मध्ये अहमदनगरमधील संगमनेर मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. राज्यात त्यांनी कृषी आणि महसूल मंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. थोरातांनी संगमनेरमध्ये अनेक सहकारी शिक्षणसंस्था स्थापन केल्या आहेत. दूध सहकार चळवळीचे ते अग्रणी नेते मानले जातात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!