Type to search

maharashtra मुख्य बातम्या

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

Share
मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी राज्य मंत्रिमंडळाने १०० कोटींची तरतूद करण्याला मंगळवारी मान्यता दिली. त्याचवेळी या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात येणार आहे. स्मारक तयार करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) देण्यात आली आहे. एमएमआरडीए हा खर्च करणार असून, नंतर सरकार ही रक्कम एमएमआरडीएला देणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची उद्या, बुधवारी जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वीच हे भव्य स्मारक महापौर बंगला परिसरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला. पर्यावरण विभागासह सर्व विभागांच्या परवानग्या मिळाल्यानंतर या भव्य स्मारकाच्या उभारणीसाठी महापौर बंगल्याची जमीन स्मारक संस्थेला देण्यासाठी 10 जानेवारी रोजी मुंबई महापालिका आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक विश्वस्त संस्थेदरम्यान महत्त्वपूर्ण करार झाला. महापौर बंगल्याच्या परिसरातील जमिनीखाली हे स्मारक उभारले जाणार आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे काम मार्गी लागल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी युती होईल का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!