Sunday, May 19, 2024
Homeनगरमनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पवार बिनविरोध

मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी पवार बिनविरोध

अहमदनगर (प्रतिनिधी) – महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी बाळासाहेब पवार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. के. मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. सूचक म्हणून संचालक जितेंद्र सारसर व बाळासाहेब गंगेकर यांनी अनुमोदन दिले.

यावेळी माजी चेरमन बाबासाहेब मुदगल, व्हा. चेअरमन विकास गीते, संचालक श्रीधर देशपांडे, किशोर कानडे, सतिष ताठे, अजय कांबळे, संचालिका चंद्रकला आढाव, आनंद तिवारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

माजी चेअरमन मुदगल म्हणले की, सर्वांच्या सहकार्यामुळेच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यात आली आहे. पतसंस्था ही मनपा कर्मचार्यांची कामधेनू आहे. गेल्या साडेतीन वर्षांमध्ये सभासदांचे विविध प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावले आहे. नूतन चेअरमन पवार म्हणाले की, सर्व संचालक मंडळाच्या व सभासदांच्या सहकार्यामुळेच चेअरमन पदाची संधी मिळाली आहे.

सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, सभासदांची शंभर वर्षांची परंपरा असलेली पतसंस्था आहे. सभासदांच्या अडीअडचणीच्या काळात पतसंस्था नेहमीच सभासदांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय राबवण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध आहोत, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या