बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरण : पवारांच्या पंपावर कोणाचा होता डोळा ?

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – आर्थिक कारणातून बाळासाहेब ऊर्फ ज्ञानदेव पवार यांनी आत्महत्या केल्यानंतर पोलिसांनी चार सावकारांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. पवार यांनी सावकारांची देणी देण्याकरीता बंगला विकला, त्यानंतर त्यांच्यावर पेट्रोलपंप विकण्यासाठी दबाव टाकला जात होता. हा दबाव टाकणारा कोण? याची उत्सुकता नगरकरांना लागून असली तरी पोलीस त्याच्यापर्यंत अद्यापतरी पोहचू शकलेले नाहीत.

सावकारी जाचाला कंटाळून ओम उद्योगसमूहाचे प्रमुख बाळासाहेब पवार यांनी रिव्हॉलवरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पोलिसांनी नवनाथ वाघ, विनायक रणशिंग, जीजी कटारिया आणि यशवंत कदम या चार सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. यातील वाघ हा पवार यांच्या पंपावरून दररोज 1 लाख रुपये व्याज घेऊन जात असल्याचा आरोप आहे. पवार यांनी ललित गुंदेचा यांना बंगला विकला. त्यानंतर ते पेट्रोलपंप विकतील यासाठी त्यांना त्रास दिला जात होता. पवार यांच्या पेट्रोलपंपावर कोणाचा डोळा होता याचा छडा पोलिस तपासात लागेल. त्याची उत्सुकता नगरकरांना लागून आहे.

LEAVE A REPLY

*