Type to search

Featured maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

बालाकोट एअरस्ट्राइक 170 दहशतवाद्यांचा खात्मा

Share

इटालीयन पत्रकाराच्या दाव्यामुळे पुन्हा चर्चा

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या 130 ते 170 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा इटलीच्या महिला पत्रकार फ्रँसेसा मॅरिनोे यांनी केला आहे. या खुलाशामुळे पाकिस्तान चांगलेच तोंडघशी पडले आहे. तसेच या हल्ल्यातील 45 जखमी दहशतवाद्यांवर पाकिस्तानातील रुग्णालयात अद्यापही उपचार सुरू असल्याचे त्यांनी चर्चेत आला आहे.

फ्रँसेसा मॅरिनो असे या इटालीयन पत्रकार महिलेचं नाव आहे. त्यांनी स्ट्रिंगरेशिया या संकेतस्थळावर एक वृत्तांत प्रसिद्ध करत या हल्ल्याची विस्तृत माहिती दिली आहे. भारतीय हवाई दलाने पहाटे साडे तीन वाजता बालाकोटवर हल्ला केला. माझ्या माहितीप्रमाणे शिंकयारी आर्मी कॅम्पवरून लष्कराची तुकडी घटनास्थळी पोहोचली. लष्कराची तुकडी हल्ल्याच्या दिवशी पहाटे 6 वाजता घटनास्थळी पोहोचली होती. शिंकयारी बालाकोटपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा पाकिस्तानी आर्मीचा बेस कॅम्पही आहे. या ठिकाणी पाकिस्तानची ज्यूनियर लीडर्स अकादमी सुद्धा आहे. आर्मीची तुकडी बालाकोटला पोहोचल्यानंतर तिथून अनेक जखमींना पाकिस्तानच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्थानिकांच्या मते अद्यापही पाकिस्तानच्या रुग्णालयात 45 लोकांवर उपचार सुरू आहे. उपचारावेळी 20 लोकांचा मृत्यू झाल्याचंही मॅरिनोनं म्हटले आहे.

डिस्चार्ज झालेले कोठडीत
उपचारानंतर डिस्चार्ज झालेल्या लोकांना पाकिस्तान आर्मीने त्यांच्या कोठडीत ठेवले आहे. या हल्ल्यातील मृतांची संख्या 130 ते 170 पर्यंत असू शकते. यात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांचाही समावेश असल्याचा दावाही मॅरिनोने केला आहे. जे अतिरेकी मारल्या गेलेत त्यात 11 ट्रेनरचा समावेश आहे. मृतांमध्ये काही बॉम्ब बनविणार्‍या आणि शस्त्र चालविण्याचं प्रशिक्षण देणार्‍यांचाही समावेश आहे. हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबांकडून कोणतीही माहिती लिक होऊ नये म्हणून जैशने विशेष तयारी केली आहे. मृतकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना जैशने नुकसान भरपाई दिल्याचंही त्यांनी वृत्तात म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!