Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकबाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटातून उलगडणार

बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्यगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटातून उलगडणार

मुंबई | प्रतिनिधी

पावनखिंडीत शत्रूचा मुकाबला करताना धारातिर्थी पडलेल्या बाजीप्रभू देशपांडे या शूर योद्ध्याची शौर्यगाथा पावनखिंड चित्रपटातून उलगडणार आहे.

- Advertisement -

डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सोशल मीडियावर त्यांनी चित्रपटाचे पोस्टरही शेअर झाले असून पावनखिंड चित्रपटाकडे लक्ष लागून राहिले आहे.

आपल्या आयुष्याचा प्रवास मावळतीकडे सुरू झालेला असताना, स्वराज्याच्या उगवत्या सूर्याला – वीर शिवाजीला, त्यांनी दिलेल्या प्राणांच्या अर्घ्याची.आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर नंतर सादर करीत आहोत कथा त्या एका रात्रीची, जिने मराठेशाहीचा इतिहास बदलून टाकला. दीपावलीच्या जल्लोषात, पराक्रम आणि बलिदानाच्या त्या रात्रीचं स्मरण ठेवूया. दिवाळी 2020, वीरश्रीची अमर कहाणी…

या चित्रपटाच्या माध्यमातून स्वराज्यासाठी, रयतेच्या राजासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या शूरवीराचा पराक्रम मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

पुढील वर्षी दिवाळीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार आहे याबाबत मात्र अद्याप कुठल्याही प्रकारची माहिती मिळू शकलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या