प्रभासनंतर आता ‘कटप्पा’चा मेणाचा पुतळा!

0
मादाम तुसाँ म्युझियममध्ये सत्यराज हे पहिले तामीळ अभिनेते ठरणार
मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमध्ये सर्वाधिक नावाजलेला बाहुबली फिल्म व त्यामधील सर्वाधिक चर्चेचा विषय असलेला कटप्पा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ‘बाहुबली’ सिनेमातील ‘कटप्पा’च्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात लोकप्रिय झालेले तामीळ अभिनेते सत्यराज यांचा मेणाचा पुतळा लवकरच लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियमध्ये दिसणार आहे. सत्यराज यांचा मेणाचा पुतळा ‘कटप्पा’च्या अवतारातच तयार केला जाणार आहे.

 

महत्त्वाचं म्हणजे सत्यराज हे पहिले तामीळ अभिनेते आहेत, ज्यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये बसवण्यात येणार आहे. याआधी 2017 मध्ये बँकॉकच्या मादाम तुसाँ वॅक्स म्युझियममध्ये प्रभासचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा ‘अमरेंद्र बाहुबली’च्या अवतारातील आहे.

LEAVE A REPLY

*