बाहुबली फेम अभिनेत्री शिवगामी झळकणार पॉर्न सिनेमात

0
मुंबई : ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटात बाहुबलीच्या आईची शिवगामी देवीची भूमिका करणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रम्या कृष्णनन लवकरच ‘Super Deluxe’ या पॉर्न सिनेमात झळकणार आहे. बाहुबली चित्रपटात रम्या हीने साकारलेली शिवगामी देवीची भूमिका तुफान लोकप्रिय झाली होती.

या भूमिकेमुळे रम्याचे नाव देशातच नाही तर साता समुद्रापार पोहचले. रम्या हीने दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.  नेहमीच्या भूमिकापेक्षा वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाल्याने आपण या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले आहे.

बाहुबली सारख्या चित्रपटात शिवगामी देवीची चरित्रभूमिका साकारणाऱ्या रम्याला पॉर्नस्टारच्या रुपात पाहणं तिच्या चाहत्यांना रुचलं नाहीये. पण केवळ आवाहन म्हणून हा चित्रपट स्विकारल्याचे रम्याने म्हटले आहे. रम्याबरोबरच विजय सेथुपथी, समांथा, फहाद फासिल आणि मास्किन हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत. 29 मार्चला हा सुपर डिलक्स प्रदर्शित होणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

*