Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

बहरीनच्या तुरुंगवासातून 250 भारतीयांची सुटका होणार

Share

नवी दिल्ली – बहरीनमध्ये कारागृहाची शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीयांची सुटका करण्याचा निर्णय बहरीन सरकारने घेतला आहे. या कैद्यांना बहरीन सरकारकडून माफी देण्यात येणार आहे. मानवतेच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचा दौरा केला होता. या दौर्‍यानंतर बहरीन सरकारने भारतीय कैद्यांची सुटका करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. बहरीन सरकारच्या या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटद्वारे बहरीन सरकारचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन बहरीन सरकारच्या या निर्णयाबद्दल माहिती दिली. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने तेथे तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीयांना माफी दिली आहे. त्यामुळे बहरीनमध्ये शिक्षा भोगत असलेल्या भारतीय नागरिकांची लवकरच सुटका करण्यात येणार आहे. बहरीन सरकारच्या या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन आभार व्यक्त केले आहेत. या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले की, बहरीनच्या शाह आणि त्यांच्या शाही कुटुंबाचे या निर्णयाचे स्वागत आणि त्यांचे आभार.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!