बहिणाबाई महोत्सव 17 पासून सागर पार्कवर

जळगाव – 

सांस्कृतिक चळवळींना बळ देण्यासह बचत गटांना सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणार्‍या व खान्देशाचे भूषण ठरलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे आयोजन 17 जानेवारीपासून येथील सागरपार्क मैदानावर करण्यात आल्याची माहिती या महोत्सवाचे पालकत्व घेतलेल्या उद्योजक रजनीकांत  कोठारी, भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी, विनोद ढगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महोत्सवाचे हे 6 वे वर्ष असून याचे उद्घाटन 17 रोजी सागरपार्क मैदानावर सायं. 5.30 वा. शहरातील नामांकित असलेले राजेश पाटील तसेच शहरातील उद्योजकांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला मंडळे, सामाजिक संस्था उपस्थित राहणार आहे. जवळपास 1 लाखावर नागरिक या महोत्सवाला भेट देतील असे आयोजन करण्यात येत आहे.

बहिणाबाईंचा चष्मा आकर्षण

मेन गेटवर भव्य अशा 40 फूटाचा बहिणाबाईंच्या चष्म्याची प्रतिकृती हे खास आकर्षण यावेळीच्या महोत्सवात राहणार आहे.  गेल्या पाच वर्षात साडे चार कोटीची आर्थिक उलाढाल या माध्यमाने झाली आहे. एका महोत्सव आयोजनाला 15 लाखापयर्र्त खर्च येतो, सिनेतारका, कलावंत, नाट्यकलावंत यांची खास उपस्थिती या महोत्सवास असते. शाळा, महाविद्यालयांचा लक्षणीय सहभाग असतो.

बचत गटांचा उत्स्फूर्त सहभाग

महिला बचत गटाने निर्माण केलेल्या वस्तूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावी, वस्तूंना योग्य किमत मिळावी त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टीने महोत्सवाचे आयोजन केले जाते. 266 बचत गट महोत्सवात सहभागी होणार आहेत. 200 गट खान्देशातील 200 गटासह बाहेरील 66 बचत गटांचा समावेश राहणार आहे.

फॅशन शोचे आयोजन

खान्देशातील विविध लोककला, शाहिरी, भारुड, लग्नगीते, वहीगायन यावेळी होईल, जवळपास 1 हजार शालेय व महाविद्यालयीन युवक मंचावर कला सादर करतील. शाहीर अजिंक्य लिंगायत औरंगाबाद, भारुड सम्राट हमीद सैय्यद अहमदनगर, चंदाताई तिवाडी पंढरपूर यांचे कार्यक्रमही होतील. गण गवळण, शाहिरी, पोवाडा, लावणी आदीसह लोककलेचा जागर या महोत्सवात होईल, फॅशन शोही या महोत्सवात होईल.

अर्चना जाधव ह्या फॅशन शो चे सादरीकरण होईल तसेच रेसीपी शो महोत्सवाचे आकर्षण असून श्रीमती शैला चौधरी यांच्या वतीने खाद्यपदार्थांचे सादरीकरण होईल.

बहिणाबाई खाद्य महोत्सव

बहिणाबाई खाद्य महोत्सव हे खास आकर्षण राहील. बचत गटाने तयार केलेल्या विविध खाद्य पदाथार्ंना विशेष मागणी असते. भरीत भाकरी, शेवभाजी, खापरावरची पुरणपोळीसह विविध खाद्य पदार्थांचा या महोत्सवाच्या निमित्ताने नागरिक आस्वाद घेत असतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com