Type to search

Featured हिट-चाट

बॅडमिंटन कोर्टवर घाम गाळतेय परिणीती चोप्रा

Share

मुंबई : एखाद्याचा चरित्रपट साकारताना कठोर मेहनत घ्यावी लागतेच. अभिनेत्री परिणीती चोप्राही सध्या तेच करतेय. काही दिवसांपूर्वीच तिने द गर्ल ऑन ट्रेनसिनेमाची शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर सध्या ती सायना नेहवालच्या चरित्रपटासाठी जोरदार तयारी करतेय. गेल्या तीन महिन्यांपासून परिणीती सायनाच्या भूमिकेसाठी बॅटमिंटनचं प्रशिक्षण घेतेय. खुद्द सायनानं टेनिस कोर्टवर सराव करतानाचा परिणीतीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा, असं सायनानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या शुभेच्छांबद्दल परिणीतीनं सायनाचे आभार मानले आहेत. थँक यू माय चॅम्पियन ! माझ्या मनात धाकधूक आहे, असं परिणीतीनं म्हटलंय. सायनाची भूमिका साकारण्यासाठी परिणीती बॅटमिंटन कोर्टवर तासनतास घाम गाळत असते. अमोल गुप्ते हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून चित्रीकरणाला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!