कांकरिया कुटुंबावरील गुन्हे मागे घ्या

0
 सर्वपक्षीय मूक मोर्चा; आरोपींच्या अटकेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी) – मुलांच्या अपहरणाच्या संशयातून मुकुंदनगर येथे उद्योगपती कांकरिया यांच्या कुटुंबातील महिलांसह तिघांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ तसेच संपूर्ण घटनेची चौकशी करून आरोपींना अटक करावी आणि कांकरिया कुटुंबावरील खोटी फिर्याद मागे घ्यावी या मागणीसाठी समाज बांधव व सर्व राजकीय पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काल सकाळी मूक मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार गोविंद दाणेज यांना निवेदन देत या घटनेचा निषेध करण्यात आला. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नवीपेठेतील जैन स्थानक येथून मूक मोर्चाची सुरुवात करण्यात आली. सर्वात पुढे महिला, त्या पाठोपाठ सर्व समाजबांधव व शेवटी राजकीय पक्षांचे नेते या मूक मोर्चात सामील झाले होते. नवी पेठ, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, दाळमंडई मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचला.
मोर्चात आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर सुनीता कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, दिलीप सातपुते, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, सुरेश कांकरिया, शैलेश मुनोत, डॉ. संदीप सुराणा, किशोर बोरा, वसंत लोढा, विपुल शेटिया, विक्रम राठोड, अभिजित खोसे, प्रा. माणिक विधाते, अजय चितळे, ऋषीकेश ताठे, सुरेश बनसोडे, सारंग पंधाडे, मीनाताई मुनोत, डॉ.हेमा सुराणा, साधना कांकरिया, संजय चोपडा, अनिल पोखार्णा, संजय गांधी, अजय बोरा, ईश्‍वर बोरा, यांच्यासह समाज बांधव व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी निषेध व्यक्त केला. याप्रसंगी सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्यासह मोठ्या पोलीस बंदोबस्त जिल्हाधिकारी कार्यालया जवळ तैनात करण्यात आला होता.
उद्योगपती कांकरिया कुटुंबावर जो हल्ला झाला त्या घटनेचा निषेध करतो. या घटनेत जे दोषी असतील त्यांना त्वरित अटक करावी. कांकरिया कुटुंबावर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्यांची चौकशी करून कुटुंबाला न्याय देण्यात यावा.
जो पर्यंत कांकरिया कुटुंबाला न्याय मिळत नाही तो पर्यंत सर्व समाजबांधव या त्यांच्या सोबत राहतील अशी ग्वाही शैलेश मुनोत यांनी दिली.

कांकरिया कुटुंबावर जो अन्याय झाला आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिवसेना भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. काही लोक या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. चितळे रस्ता भागात एखादी घटना घडली तर पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करते, मात्र आता का नाही करीत? तेव्हा मुकुंदनगर परिसरात हल्ला करणार्‍यांना 24 तासांत अटक न केल्यास शिवेसना स्टाईलने आंदोलन केले जाईल.  कांकरिया कुटुंबावर जो अन्याय झाला आहे. त्या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. शिवसेना भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे. काही लोक या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. चितळे रस्ता भागात एखादी घटना घडली तर पोलीस प्रशासन त्वरित कारवाई करते, मात्र आता का नाही करीत? तेव्हा मुकुंदनगर परिसरात हल्ला करणार्‍यांना 24 तासांत अटक न केल्यास शिवेसना स्टाईलने आंदोलन केले जाईल. – अनिल राठोड, माजी आमदार

  पोलीस प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. घटनेच्या दिवशी तेथील एका पोलीस कर्मचार्‍याने आपल्या जीवाची बाजी लावत कांकरिया कुटुंबाला वाचविण्याचा प्रयत्न केले. या कुटुंबावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आरोपींना त्वरित अटक करून गुन्ह्याचा सखोल तपास करावा. दोन दिवसांत आरोपींना अटक नाही झाली तर बुधवारपासून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. – संग्राम जगताप, आमदार

ज्या दिवशी ही घटना घडली, त्यावेळी तेथील गुंडानी पोलिसावर सुध्दा हात टाकण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाने त्याचवेळी कठोर कारवाई करण्याची गरज होती. दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे. हे कुटुंब समाजात प्रतिष्ठित आहे. पोलीस प्रशासनाने शांत न राहता, गुडंाना पकडून त्यांच्यावर काठोर कारवाई करावी.
– सुवेंद्र गांधी, नगरसेवक 

 

LEAVE A REPLY

*