Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

बाभळेश्‍वर सबस्टेशनला आग

Share

दोन तासांनी आगीवर नियंत्रण

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ (बाभळेश्वर) येथील 400 केव्ही सब स्टेशनमध्ये पावसामुळे ट्रान्सफॉर्मरचे रीअ‍ॅक्टर फुटले. त्यातील ऑईलने पेट घेतल्यामुळे मोठी आग लागली. जवळपास नऊ अग्निशामक बबांनी सव्वादोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीमुळे सब स्टेशनमधील रहिवांशामध्ये घबराटीचे वातावरण होते. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरी निर्मळ परिसरात दमदार पाऊस झाला. मात्र गावाच्या दक्षिण शिवारात असलेल्या वीज पारेषण कंपनीच्या 400 केव्ही सब स्टेशन मधील ट्रान्संफॉर्मरचा रीअ‍ॅक्टर वीज पडल्याने फुटला. त्यामुळे त्याच्यातील बाहेर पडल्यामुळे त्यामध्ये प्रंचड मोठी आग लागली.

या रीअ‍ॅक्टरमध्ये जवळपास पाच हजार लिटर ऑईल होते. तसेच विजेचे सब स्टेशन असल्याने व ऑईलने पेट घेतल्याने पाण्याने ही आग विझवणे शक्य नव्हते. परिसरातील प्रवरा, राहाता, शिर्डी, कोपरगाव आदी साखर कारखाने व नगरपालिकांच्या आठ अग्नीशामक दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी आल्या होत्या. आग विझविण्यासाठी फोमचा वापर करण्यात आला. आग मोठी असल्याने पिंपरी निर्मळ तसेच राजुरी बाभळेश्वरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. या सबस्टेशनच्या शेजारी कर्मचार्‍यांची वसाहत असुन या रहिवांशामध्ये प्रंचड भितीचे वातावरण पसरले होते. जवळपास सात वाजता लागलेली आग सव्वा दोन तांसांनी म्हणजे रात्री सव्वा नऊ वाजता विझविण्यात यश आले. वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

महा पारेषण कंपनीचे कार्यकारी अभियता संदीप लहरे यांनी वीज पडल्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तविली. मात्र स्टॅडबाय व्यवस्था असल्यामुळे कोणत्याच भागाचा विजपुरवठा खंडीत होणार नसल्याचे सांगितले. या भागात काही ठिकाणी अंधार असल्यामुळे काहीच दिसत_ नव्हते. त्यात पावसाची भूरभूर चालू झाल्यामुळे आगीच्या ठिकाणी जाण्यास कोणीही धजत नव्हते.पाण्याने ही आग विझणे शक्य नव्हते. परंतु एकएक आग विझविण्याचे बंब आल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्‍वास सोडला.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!