मुस्लिम बांधवांकडून ‘अजान’ तर हिंदू एकतातर्फे ‘आरती’

0
जुने नाशिक । बाबरी मशिद शहीद दिनानिमित्त शहरातील विविध भागात मुस्लिम बांधवांनी दुपारी सामुदायीक अजान देऊन जगाच्या शांततेसाठी तसेच भारतदेशातील एकता अखंडता अबाधीत रहावी, यासाठी विशेष प्रार्थना केली. रजा अ‍ॅकेडमीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन मशिद पुन्हा त्याच जागी बांधण्यात यावी, अशी मागणी केली.

6 डिसेंबर 1192 मध्ये बाबरी मशिद शहीद झाली होती. म्हणून दरवर्षी मुस्लिम बांधव विविध कार्यक्रमांनी याची आठवण करीत असतात. आज (दि.6) दुपारी. 3. 45 वाजेच्या सुमारास अनेक मशिदींमधून अजान देण्याचा कार्यक्रम झाला. त्याचप्रमाणे शालिमार येथील शाहजानी मशिद, कथडा मुख्य चौकात व आयशा मशिद जवळ सामुदीयकपणे अजान देऊन प्रार्थना करण्याचे कार्यक्रम झाले.

शालिमार येथे झालेल्या कार्यक्रमात रजा अकॅडमीचे एजाज रजा, असलम खान, एजाज काझी, वसीम पिरजादा, मोबीन शेख, रमजान शेख, मुख्तार शेख, डॉ. रईस रजवी, जावेद मुन्शी आदी उपस्थित होते. कथडा चौकात झालेल्या कार्यक्रमात टिपू रजा फाऊंडेशनचे टिपू रजा, शहर अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष हनिफ बशीर, फजल शेख, नाजीम सय्यद, इसाक कुरैशी, हाजी नाजीम खान, नासीर खान आदी उपस्थित होते.

आयशा मशिद जवळ झालेल्या कार्यक्रमात मशिदीचे इमाम हाफीज जाहीद, मुजाहीद फारुकी, अब्दुल रज्जाक, शफीक शेख यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरीक व तरुण मंडळी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. बडी दर्गा शरीफ येथे लोबान प्रसंगी देखील दुआ करण्यात आली.

6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जुने नाशिक परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. धार्मिक स्थळांभोवती सशस्त्र पोलिस तैनात होते.

द्वारका येथे पुजन : हिंदु एकता आंदोलन पक्ष नाशिकतर्फे द्वारका येथे हिंदु विजय शौर्य दिनानिमित्त श्रीराम प्रभूंचे पूजन आरती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी रामसिंग बावरी, अनिल जाधव, प्रसाद बावरी, मनोज मराठे, करणसिंग बावरी, दशरथ माऊलीकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*