#BaapWaliBaat #EarlyMomentsMatter : ‘युनिसेफ’ने घेतली आमिर खानच्या ‘त्या’ फोटोची दखल

0

‘फादर्स डे’ आता दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच अभिनेता आमिर खान आणि त्याच्या मुलाचा एक सुरेख फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या फोटोमध्ये आमिरच्या पत्नीने म्हणजेच किरण रावने आझादला उचलून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोमधील आमिरच्या चेहऱ्यावरील भाव पाहता आझादप्रती असणारं त्याचं प्रेम त्यातून व्यक्त होत. आपल्या मुलाचं बालपण म्हणजे बऱ्याच पालकांसाठी एक महत्त्वाचा ठेवा असतो.

अनेकदा याच आठवणी जागवत पालक त्यात रंगून जातात. अगदी आमिरही आझादच्या बालपणीचा हा फोटो पोस्ट करुन त्यामध्ये रमल्याचं पाहायला मिळत आहे.

‘युनिसेफ’च्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. या ट्विटमध्ये आमिरलाही टॅग करण्यात आलं आहे. हा फोटो पाहून अनेकांनीच आमिरचा उल्लेख एक परफेक्ट पिता म्हणून केला आहे.

 

LEAVE A REPLY

*