अय्यप्पा मंदिरात उत्सवास प्रारंभ

0

दोन महिने कार्यक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील श्री अय्यप्पा मंदिरात काल (दि.15) पासून 60 दिवसांच्या मंडल महापूजा, मकर विलक्कु उत्सवास प्रारंभ होत आहे. या उत्साहात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष के के शेट्टी यांनी दिली.

उद्या गुरूवारी (दि.16) संध्याकाळी मंडल महापूजा ,महागणपती हवन व अयप्पा स्वामी पुष्पाभिषेक होणार आहे. बुधवारी (दि.14 जानेवारी) मकर वीलक्कु उत्सव होणार आहे. दक्षिण भारतीयासह महाराष्ट्रातील भाविकाची श्रद्धा असलेले अय्यप्पाचे मंदिर केरळ मधील शबरीमळा येथे असून त्या उत्सवाच्या धर्तीवर नगरमध्ये हा उत्सव केला जातो.

उत्सवानिमित्त अय्यप्पा मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मंदिराचे पितळी काम केरळ मधून आलेल्या पाच कारागिरांनी वॉशिंग , बफिंग करून त्यावर मेटल पॉलिश केले आहे. त्यामुळे मंदिराचे रूप पालटले आहे. मंदिराला चारही बाजूने ओवर्‍या असून मध्यभागी आयप्पा स्वामींचे मंदिर असून एका बाजूला गणपती व दुसर्‍या बाजूला सरस्वतीचे मंदिर आहे. तीनही मंदिरातील मुर्त्या प्रसन्न असून बाहेरील बाजूस स्वतंत्र स्वयंपाक गृह असून महाप्रसादासाठी स्वतंत्र हॉल आहे. प्रत्येक शनिवारी व रविवारी मोठ्या संख्येने भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात.

उत्सवानिम्मित 60 दिवस दररोज धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. पहाटे 5 वा पल्लीयुनथरल नंतर निर्मल दर्शन, सकाळी 6 वाजता अभिषेक , गणपती होम, सकाळी 7 वाजता प्रसन्न पूजा होणार आहे.दहा वाजेपर्यंत अर्चना, निरांजन व विविध पूजा व नवसासाठी दर्शन होणार आहे तसेच संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा पर्यंत अलंकार दर्शन , नंतर दीप आराधना , महाआरती . रात्री 8 वाजता अथर्व पूजा व नंतर दर्शन , अर्चना , निरांजन आणि भजन होणार आहे. शेवटी हरी वरासम होऊन एक एक दिवा बंद करून अंधार करण्यात आला . हे दृश्य अतिशय मनमोहक असते. अय्यप्पा सेवा समितीने आयोजित केलेल्या या दोन महिन्याचा उत्सवास भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष के के शेट्टी व अय्यप्पा सेवा सेमितीच्या पदाधिकारी तसेच भक्त मंडळाने केले आहे.

…………
या उत्सवात अनेक दिवस मंदिर फुलांनी सजविले जाते. 26 डिसेंबर 14 जानेवारीला अय्यप्पा स्वामींची सावेडीतून भव्य शोभायात्रा ( तालापोल्ली ) काढण्यात येते. या यात्रेत महिला मोती कलरच्या साड्या परिधान करून हातात फुलांनी सजवलेली ताट व त्यामध्ये अर्धा नारळ दिवा प्रज्वलित करतात. ही तालापोल्ली पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. मंदीर परिसर फुलांनी व दिव्यांनी सजविण्यात येतो.

LEAVE A REPLY

*