अयोध्या प्रकरण : आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी

0

अयोध्येतील राम जन्मभूमी व बाबरी मशिद वादाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दाखल झालेल्या याचिकांवर आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

याप्रकरणी 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात एकूण 13 अपील दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये विविध 8 भाषांतील अपिलांचा समावेश आहे.

या अपिलांवर सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नझीर यांचे विशेष खंडपीठ मंगळवारी (दि.5) दुपारी 2 वाजता अंतिम सुनावणीला सुरुवात करणार आहेत.

LEAVE A REPLY

*