Type to search

Featured देश विदेश मुख्य बातम्या

आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल – काँग्रेस

Share
काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या मुलाखतीला शरद पवार, Congress District President Sharad Pawar Interview Ahmednagar

नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता राजकारणासाठी रामाच्या नावाचा वापर थांबेल. तसेच या निर्णयाचे काँग्रेस स्वागत करत आहे असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांनी म्हटलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. आम्ही राम मंदिर बांधण्याच्या बाजूने आहोत. या निर्णयाने फक्त राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले नाहीत, तर राम मंदिराच्या मुद्यावरून राजकारण करण्याचे दरवाजे बंद झाले आहेत असं देखील सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या निकालाचा काँग्रेस सन्मान करते. हा निकाल एक प्रकारे श्रद्धा व विश्वासाचाही सन्मान आहे. सर्व समाजघटकांनी न्यायालयाचा निकाल मान्य करून शांतता राखावी. देशातील परस्पर सौहार्द व एकतेची परंपरा जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. रामजन्मभूमीच्या निर्णयाचं श्रेय कोणतीही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेने घेण्याचा प्रश्नच येत नाही असेही ते म्हणाले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!