Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशराम मंदिर देणग्यांवर मिळणार करसवलत

राम मंदिर देणग्यांवर मिळणार करसवलत

सार्वमत

नवी दिल्ली – अयोध्येत भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्यासाठी दिल्या जाणार्‍या देणग्यांवर कर सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, याबाबतची अधिसूचना शुकवारी जारी करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालायाने हा अध्यादेश जारी केला आहे. यानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणार्‍यांना करात सूट दिली जाणार आहे. ही सूट केवळ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मदत केल्यानंतरच मिळणार आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी अयोध्या वादावर ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर, या वर्षीच्या सुरुवातीला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची निर्मिती करण्यात आली. रामाचे भव्य मंदिर उभारणीसाठी नागरिक, संस्था देणग्या देत आहेत. या देणग्यांवर आयकरातून सूट मिळविण्यासाठी ट्रस्टकडून प्राप्त झालेली देणगीची पावती जवळ असणे आवश्यक आहे. यात ट्रस्टचे नाव, पत्ता, पॅन क्रमांक, देणगी देणार्‍याचे नाव आणि देणगीची राशी नमूद असायला हवी, असे या अधिसूचनेत नमूद आहे.

आयकर कायद्याच्या कलम 80 जी नुसार सर्व धार्मिक ट्रस्टला सूट दिली जात नाही. धार्मिक ट्रस्टला आधी कलम 11 आणि 12 नुसार आयकरातील सूट प्राप्त करण्यासाठी नोंदणी अर्ज सादर करावा लागतो. त्यानंतर कलम 80 जी नुसार सूट दिली जाते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील अनेक तीर्थक्षेत्रांचा उल्लेख ऐतिहासिक महत्त्वाचे स्थान तसेच सार्वजनिक पूजेचे प्रसिद्ध स्थान म्हणून केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या