पुरस्कारार्थी शिक्षक जाहीर : सौ. विखे

0

आज पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चेचा विषय असणार्‍या जिल्हा शिक्षकांच्या पुरस्कारांचा तिढा सुटला आहे. विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी 14 पुरस्कारार्थी नावांवर मंगळवारी शिक्कामोर्तब केला. आज शिक्षकदिनी या शिक्षकांचा पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. दरवर्षी राज्य सरकारच्यावतीने प्रत्येक तालुक्यातून एक अशा 14 शिक्षकांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

यंदाही प्रत्येकी तालुक्यातून तीन शिक्षकांची प्रस्ताव मागून त्यांची छाननी केल्यानंतर जिल्हास्तरावरून पुन्हा स्वतंत्र टीम पाठवून फेर तपासणी आणि 25 गुणांची लेखी परीक्षा घेऊन या 14 शिक्षकांची निवड अंतिम केली आहे. यंदाही शिक्षकांच्या निवड चांगलीच गाजली. काही तालुक्यात जिल्हास्तरीय फेर तपासणीत हस्तक्षेप झाल्याचा आरोप झाला. तर श्रीगोंदा तालुक्यातील शिक्षक लेखी परीक्षेला गैरहजर राहिला. मात्र, तालुकास्तरीय तपासणी सर्वाधिक गुण मिळाल्याने त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. दरम्यान, निवड झालेल्या शिक्षकांची निवड पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने झालेली असल्याचा दावा जिल्हा परिषद अध्यक्षा विखे यांनी केला आहे. आज होणार्‍या कार्यक्रमाला उपाध्यक्ष राजश्रीताई घुले, सभापती कैलास वाकचौरे, अजय फटांगरे, अनुराधा नागवडे, उमेश परहर आणि शिक्षण समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

हे आहेत पुरस्कारार्थी
सुनीता प्रभाकर वलटे पानसरवाडी (अकोले), दिगंबर सोमनाथ फटांगरे धुमाळवाडी (संगमनेर), सुधाकर दत्तात्रय निकुंभ डाऊच (कोपरगाव), मिलिंद आनंदराव खंडीझोड रामपूरवाडी (राहाता), राजू विठ्ठल भालेराव माळेवाडी (श्रीरामपूर), विजय केशव कांडेकर करपरावाडी (राहुरी), बाळकृष्ण मधुकरराव मुळे नजिक चिंचोली (नेवासा), शुभांगी भाऊसाहेब शेलार शेवगाव मुली (शेवगाव), शहादेव बाबासाहेब काळे (पाथर्डी), रत्नमाला सखाराम खुटे इंदिरानगर (जामखेड), प्रितम दत्तात्रय गुरव दुधोडी (कर्जत), भाऊसाहेब बन्सी दातीर शेडगाव (श्रीगोंदा), मंगेश वसंतराव खिलारी टाकळी ढोकेश्‍वर (पारनेर), लक्ष्मण रंगनाथ टिमकरे जेऊर (नगर), आणि केंद्रप्रमुख मंगल चंद्रकांत महामुनी (नगर) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*