माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांना ‘आबासाहेब वीर’ पुरस्कार

0
कोपरगाव (प्रतिनिधी) – संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक व साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष तथा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी सहकार, राजकारण, समाजकारण, शिक्षण आदी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यंदाचा किसनवीर साखर कारखान्यांच्यावतींने देण्यात येणारा राज्यस्तरीय आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे वितरण 14 ऑगस्ट रोजी सातारा येथे माजी राज्यपाल व शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे.
किसनवीर साखर कारखान्यांचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी आबासाहेब वीर यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे 21 वर्षे असून एक लाख रुपये रोख सन्मानपत्र असे याचे स्वरूप असल्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी नुकतेच जाहीर केले. किसनवीर यांच्या 112 व्या जयंतीनिमीत्त 14 ऑगस्ट रोजी त्याचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापराव भोसले असणार आहे.
सार्वजनिक जीवनात विशेषत: सहकार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, साहित्य कला अशा विविध क्षेत्रांत वैशिष्ट्यपूर्ण काम करून समाजहित साधणार्‍या व समाजाच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देण्यासाठी सतत प्रयत्न करणार्‍या व्यक्तींची यासाठी निवड केली जाते. पुरस्कार निवडीसाठी प्रा. संभाजीराव पाटणे, उपराकार लक्ष्मण माने, प्रा. वसंतराव जगताप आदींची समिती गठीत करण्यात आली होती. त्यांनी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली.

LEAVE A REPLY

*