जीवन गौरव पुरस्कार हाच वाकचौरे यांचा खरा सन्मान

0

आ. बाळासाहेब थोरात : अगस्ती देवस्थान ट्रस्टचा वारकरी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

अकोले (प्रतिनिधी) – धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी विष्णू महाराज वाकचौरे यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांना मिळालेला वारकरी जीवन गौरव पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला असून त्यांचा हा खरा सन्मान आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील अगस्ती देवस्थान ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा वारकरी जीवन गौरव पुरस्कार 2017 हा कळस येथील गुरुवर्य विष्णू महाराज वाकचौरे यांना ज्ञानेश योग आश्रम, डोंगरगण येथील पुंडलिक महाराज जंगले (शास्त्री) यांच्या हस्ते सपत्नीक प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी पाटबंधारे मंत्री बी. जे. खताळ होते.
यावेळी माजी आदिवासी विकासमंत्री मधुकरराव पिचड, आ. वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथराव सावंत, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वाकचौरे, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गिरिजाजी जाधव, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, खजिनदार एस. पी. देशमुख, सेक्रेटरी यशवंत आभाळे, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे, अगस्ती आश्रम आळंदीचे अध्यक्ष रामनाथ महाराज जाधव, अगस्ती देवस्थानचे विश्वस्त मनोहर महाराज भोर, बद्रीनाथ मुंदडा, पुष्पाताई वाकचौरे आदी उपस्थित होते.
आ. वैभवराव पिचड यांचे भाषण झाले. अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ यांनी प्रास्ताविकात ट्रस्टची माहिती दिली.ट्रस्टचे विश्वस्त परबतराव नाईकवाडी यांनी स्वागत केले. राजेंद्र महाराज नवले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक जोंधळे यांनी मानपत्राचे वाचन केले. विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांनी आभार मानले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे विश्वस्त गुलाबराव शेवाळे, संतू भरीतकर, नवनाथ गायकवाड, किसन लहामगे, बाळासाहेब भांगरे, शांताराम पापळ, भीमराज भांगरे, रामनाथ वावळे, आत्माराम शेळके, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक आदींनी परिश्रम घेतले.
प्रारंभी विष्णू महाराज वाकचौरे यांची कळस व अकोले शहरातून भव्य मिरवणूक कळसेश्वर भजनी मंडळ व बाळाराम महाराज रंधे वारकरी संस्थेच्यावतीने काढण्यात आली.

 

वारकरी संप्रदायात उच्च शिक्षित व्यक्ती आल्यामुळे हा समाज सुधारण्याचे कार्य झाले अन् ते काम विष्णू वाकचौरे यांनी केल्याचे गौरवोद्गार काढले. पण तालुक्यात दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याची खंत माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी व्यक्त केली.

आयुष्यभर विष्णू महाराज वाकचौरे यांनी धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी जीवन समर्पित केले. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी जीवनाचे सोने केले. ज्या ठिकाणी काम करायचे तेथे मनापासून करायचे. शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून त्यांनी मनापासून काम केले. समाजाला दिशा देण्याचे काम वारकरी संप्रदाय करत असतो आणि ते काम चांगले केले तर शेवटचा दिवस गोड होतो, असे आ. बाळासाहेब थोरात म्हणाले.

LEAVE A REPLY

*