अकोलेत नवदुर्गांचा सन्मान

0

अकोले (प्रतिनिधी)- येथील शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्यावतीने मानवाधिकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या हेमलताताई पिचड(पर्यावरण), आदिवासी भागात सेंद्रिय बी बियाणांची बँक बनविणार्‍या राहिबाई पोपेरे (जैविक),

मालतीताई गोडसे (उत्कृष्ट माता), यशोदाबाई गडाख (शेती) यांना नवदुर्गा पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल अगस्ती शिक्षण संस्थेच्या सेक्रेटरी दुर्गाताई नाईकवाडी यांचा पुरस्कार अगस्ती विद्यालयातील काही विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपात स्वीकारला.

शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त अकोले महाविद्यालयाच्या बुवासाहेब नवले रंगमंचावर आयोजित केलेल्या समाज प्रबोधनकार, शिव चरित्राचे गाढे अभ्यासक डॉ. विजय तनपुरे यांच्या वाणीतून सातासमुद्रापार गाजलेल्या मी बी घडलो तुम्ही बी घडा या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.

अध्यक्षस्थानी लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात श्री. कोते यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चात उल्लेखनीय नियोजनबद्दल डॉ. संदीप कडलग यांचाही गौरव करण्यात आला.

अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विक्रम नवले यांचे सहकार्य लाभले. यावेळी अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, राजूरच्या सरपंच हेमलताताई पिचड, अकोले नगरपालिकेचे नगराध्यक्ष के. डी. धुमाळ, जि. प. सदस्य डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, पं. स. चे उपसभापती मारुती मेंगाळ, सेनेचे सतीश भांगरे, अगस्ती कारखान्याचे संचालक, उद्योजक सुरेश गड़ाख, उद्योजक नितिन गोडसे,

आर्किटेक्ट चेतन नाईकवाड़ी, नगरसेविका सोनाली नाईकवाडी, दूध संघाचे संचालक शरद चौधरी, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष शंभू नेहे, आनंदराव नवले, अरुण रुपवते, रोटरी क्लबचे अध्यक्ष अमोल वैद्य, पत्रकार संघाचे संस्थापक विजयराव पोखरकर, आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिकेत चौधरी, सोमेश भिंगारे, मयूर धुमाल,

राम जोरवर, श्रीकांत मालूंजकर, धनराज हासे, अनिकेत कडलग, शुभम सासवडे, अक्षय धुमाळ, शुभम रासणे, अनिकेत धादवड, प्रतिक देशमुख, विशाल वैद्य, सौरभ लगड, शुभम नवले, विक्रम माळवे, गोपाल घोलप, दीपक ढमढेरे, शुभम सगर, शुभम नवले, ओमकर हासे,

पराग़ चौधरी, जय मुर्तड़क, मंगेश शेटे, देवेश दिघे, गौरव वाघमारे, पुष्कर राठी, रोहन पाटील, राकेश नवले, अथर्व गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक व स्वागत प्रतिष्ठानचे अनिकेत चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन घनश्याम माने यांनी केले.

LEAVE A REPLY

*