अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या ‘मेधा’ नियतकालिकास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुरस्कार

0

संगमनेर (प्रतिनिधी)-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्था यांनी सन 2015-16 मध्ये प्रकाशित केलेल्या नियतकालिकांची स्पर्धा विद्यार्थी विकास मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आली होती़ या स्पर्धेत संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘मेधा’ या नियतकालिकास व्यावसायिक विभागातून अहमदनगर विभागस्तरावरील द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचा पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठातील संत नामदेव सभागृहामध्ये संपन्न झाला़ यावेळी सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमृतवाहिनी सदैव विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी ज्ञानाबरोबरच कलागुणांना वाव मिळावा यादृष्टीने वेगवेगळे व्यासपीठ तयार करून देत असते़
या समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ नितीन करमळकर, कुलसचिव डॉ़ अरविंद शाळीग्राम, परीक्षा विभाग प्रमुख डॉ़ अशोक चव्हाण, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ़ प्रभाकर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते़ यावेळी सदर पुरस्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा़ ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा़ व्ही़ पी़ वाघे, मेधा नियतकालिकाचे संपादक प्रा़ सुदीप हासे व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला.

विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी मेधा नियतकालिकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली़ वर्षभर चाललेल्या या प्रक्रियेमध्ये सुदीप हासे, धनवंती ताजणे, हेमंत पठाडे, सचिन खर्डे, अरुण कचरे, सुजीत चौधरी, विक्रम अभंग, विजय कुमार, महेंद्र डोंगरे, अमृता लगे या सर्व प्राध्यापक वर्ग व विभाग प्रमुख यांनी मोलाचे सहकार्य केले. वर्षभर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट साहित्य दिले़ सामाजिक, ग्रामीण, प्रेरणात्मक लेख, कथा, कविता, चारोळ्यांचे लेखन केले. हे सर्व लेखन वेगवेगळ्या पातळीवर तपासण्यात आले आणि नंतर डिझाईन पूर्ण करण्यात आली. विद्यार्थी प्रतिनिधी राहुल मगर, कुलदीप उगले, दिपीका वर्पे, किरण भांड, रोहिणी नेहे, राहुल वाळुंज, सागर उमरे, शितल गलांडे, स्नेहल गवांदे, झैदी झैनाब, प्रणिता शिंदे, देवयानी पाटील व अक्षदा गुंजाळ यांनी उत्कृष्ट सहकार्य केले व प्रकाशनात मोलाचा वाटा उचलला.

‘मेधा’मध्ये नाविन्यता-कुलगुरू डॉ. करमळकर –
‘मेधा’ या नियतकालिकामध्ये नाविन्यता असून पुढील वाटचालीस डॉ. करमळकर यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ट्रॅाफी, प्रशस्तीपत्रक व सहा हजार रुपयांचे पारितोषिक अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टीमने स्वीकारले.

LEAVE A REPLY

*