औरंगाबाद – Aurangabad
उद्यापासून लॉकडाऊन लागणार असे घोषित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकप्रतिनिधी सोबतच्या बैठकीत विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
- Advertisement -
तसेच मुख्य सचिव व मुख्यमंत्री यांच्यासोबत देखील चर्चा करण्यात आली त्यांनी या सर्व लॉकडाऊन संदर्भात अनेक सूचना केल्या. त्या सूचनांचे पालन होण्यासाठी काही कालावधी गरजेचा आहे. त्यामुळे सध्या आज रात्री पासून होणारा लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी रात्री दहा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
उद्यापासून होणारे लॉकडाऊन स्थगित केले असले तरी रात्री ८ वाजता लागणारी संचारबंदी व शनिवार-रविवार असणारे लॉकडाऊन मात्र कायम असणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.