Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : आपल्या भागात कुठे मिळणार भाजीपाला? ही आहेत अधिकृत ठिकाणं

Share

नाशिक  | प्रतिनिधी

केंद्र सरकारने तीन आठवड्यांचा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी होवू नये यासाठी नाशिक महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी विभागनिहाय काही भाजीबाजाराची ठिकाणे निश्चित केली आहेत.

नाशिक पूर्व ७, नाशिक पश्चिम ५, पंचवटी १०, नाशिक रोड १५, सातपूर ५, नवीन नाशिक ५ या सहा विभागात खालील ठिकाणी ही भाजीबाजार केंद्रे असतील शहरात अशी एकूण ४७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

अशी आहेत विभागनिहाय भाजीबाजार केंद्र

नाशिक पूर्व
साईनाथ नगर चौफुली परिसर, कलानगर, फुले मार्केट परिसर, गांधीनगर, द्वारका परिसर,आझाद चौक परिसर.

नाशिक पश्चिम
वावरे पटांगण- भद्रकाली, आकाशवाणी टॉवर- गंगापूर रोड, शरणपूर भाजी मार्केट, रोकडोबा पटागंण, यशवंत मंडई,रविवार कारंजा.

पंचवटी
आरटीओ कॉर्नर, बोरगड, गंगाघाट परीसर, पेठरोड परीसर, लाटेनगर, हिरावाडी, कोणार्कनगर, निलगिरी बाग, जत्रा हॉटेलसमोर, औरंगाबाद रोड, दिंडोरी रोड, महालक्ष्मी टॉकीजजवळ, म्हसरूल दिंडोरीरोड.

नाशिकरोड
शनिमंदीर जवळ- पंचक, मंगलमूर्तीनगर- श्रीसमृद्धी अपार्टमेंट जेलरोड, कॅनॉलरोड, गंगासागर बिल्डींग- जेलरोड, मनपा निसर्ग उपचार केंद्र-जेतवननगर, म्हसोबा मंदीर जवळ- बिगबाजार, भालेराव मळा – जयभवानी रोड, सोमानी गार्डन -एम.जी रोड, दुर्गा उद्यानालगत भाजी मार्केट, क्रांतीचौक , डॉ.बाबासाहेब आंबेडकररोडवरील सर्व्हिस रोड, सिन्नर फाटा अधिकृत भाजी मार्केट, देवळाली गाव आठवडे बाजार , अधिकृत यशवंत मंडई- देवळाली गाव, मकरंद कॉलनी-उपनगर जेलरोड.

सातपूर
शिवाजी मंडई, श्री छत्रपती शिवाजी महाजन भाजी मंडई,डॉ.बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट,सातपूर कॉलनी, विश्वासनगर भाजी मार्केट गंगापूर गाव, गंगापूर गाव भाजी मार्केट.

नवीन नाशिक
शिवाजी चौक- जुने सिडको, गामणे मळा- पाथर्डी फाटाजवळ, धनलक्ष्मी शाळेसमोरील मैदान- पाथर्डी फाटा, उपेंद्रनगर त्रिमुर्ती चौक – पाटील नगर नागरिकांनी या ठिकाणी भाजीपाला खरेदी करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!