पुजाराने खिंड लढवली; भारताच्या पहिल्या दिवशी ९ बाद २५० धावा

0

अडीलेड | भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आजपासून पहिल्या कसोटीला आज सकाळपासून सुरुवात झाली. भारताचे पहिले चार फलंदाज अवघ्या ४१ धावसंख्या असतानाच बाद झाले. नंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने अखेरपर्यंत खिंड लढवत भारताची धावसंख्या अडीचशेच्या पार नेली. रोहित शर्माच्या ३७ धावा आणि ऋषभ पंत आणि रविचंद्रन अश्विनच्या प्रत्येकी २५ धावा वगळता कुठलाही फलंदाज टिकू शकला नाही.

कर्णधार विराट कोहली ३ धावा, सलामीवीर लोकेश राहुल ३ आणि मुरली विजय ११ धावांवर तंबूत परतले. भारताची अवस्था यावेळी चार बाद ४१ अशी होती. चेतेश्वर पुजाराने मात्र एक-एक धाव जोडत २४६ चेंडू खेळले. यात त्याने सात चौकार आणि दोन उत्तुंग षटकारांच्या जोरावर १२३ धावांचे योगदान दिले.

पुजाराच्या खेळीनेच भारताचा डाव सावरला. भारत मोठी धावसंख्या जरी पहिल्या डावांत उभारू शकला नसला तरी ८७.५  षटकामध्ये भारताने अडीचशे धावांचा पल्ला गाठला आहे.

ऑस्ट्रेलियाकडून मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, पट कमिन्स, नाथन लियोन या गोलंदाजांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर पुजारा एक धाव चोरण्याच्या नादात धावबाद झाला.

LEAVE A REPLY

*