Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

वंचित-एमआयएममध्ये उभी फूट; एमआयएम स्वबळावर लढणार

Share

औरंगाबाद : गेल्या लोकसभा निवडणुकीत एकजुटीचा नारा देत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणाऱ्या वंचित बहुजन आघाडी व एमआयएम मध्ये फूट पडली आहे.

दरम्यान जागा वाटप व्यवस्थित होत नसल्याने आम्ही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा एम आयएम नेते इम्तियाज जलील यांनी केली. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडी वंचित झाली आहे.

दि. ०३ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर व खासदार ओवेसी यांच्यात बैठक घेण्यात आली होती. यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात आली. दोन दिवसांनंतर समाधानकारक निर्णय न झाल्याने ‘एमआयएम’ राज्यात स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!