Friday, May 3, 2024
HomeUncategorizedरोमियोच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

रोमियोच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

औरंगाबाद – aurangabad

सतत पाठलाग करून त्रास देत समाजात बदनामी करणार्‍या रोडरोमिओच्या छळास कंटाळून २० वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना हमालवाडा येथे घडली. या प्रकरणी सातारा (satara) पोलीस (police) ठाण्यात रोडरोमिओविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisement -

या शिवसैनिक व्यापाऱ्याकडे इन्कम टॅक्सची धाड

रेल्वेस्टेशन, हमालवाडा येथील साई अमृत प्लाझामध्ये अदिती दिनेश राठौर (२०) ही बीबीएच्या दुसर्‍या वर्गात शिकते. राठौर कुटुंबीय हे शांतिपुरा छावणी येथे राहत असताना हेमंत ससाने हा नेहमी तिचा पाठलाग करून प्रेम करण्यास भाग पाडत होता. मात्र, अदितीने नकार दिल्याने तो नेहमी तिचा पाठलाग करून मोबाईवर बोलत होता. यामुळे अदितीच्या आई-वडिलांनी ससाने कुटुंबीयांना समजावून सांगितले होते. त्यानंतर काही दिवस हेमंत ससाने हा शांत होता. त्यानंतर पुन्हा तो तिचा छळ करून त्रास देऊ लागला. शुक्रवारी सायंकाळी हेमंतने अदितीशी मोबाईलवर संपर्क केला. दोघांत पुन्हा बाद झाला. वादानंतर आदितीने आत्महत्या करण्याची धमकी देत मोबाईल कट केला. घाबरलेल्या हेमंतने तात्काळ अदितीची आई वीणा यांना संपर्क करून अदिती काही बरे-वाईट करून शकते, यासाठी तुम्ही तात्काळ घरी पोहचा, असे सांगितले. हाकेच्या अंतरावर असलेल्या वीणा राठौर यांनी तात्काळ घरी धाव घेतली. दरवाजा बंद असल्याने त्यांनी दार ठोठावले. मात्र, आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने दार तोडले असता त्यांना अदिती लटकलेली दिसली.

बेशुद्धावस्थेत तिला घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. हेमंत ससाने याच्या त्रासाला कंटाळून अदितीने आत्महत्या केल्याची तक्रार वीणा दिनेश राठौर यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिली. उपनिरीक्षक एस.बी. गोरे यांनी हेमंत ससानेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या