Friday, May 3, 2024
Homeनगरमतदांरावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; 16 पहिलवानांवर गुन्हा दाखल

मतदांरावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न; 16 पहिलवानांवर गुन्हा दाखल

कर्जत |वार्ताहर|Karjat

तालुक्यातील पाटेगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानासाठी 16 बाउन्सर आणून मतदांरावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला

- Advertisement -

म्हणून गव्हरमेंट कॉन्ट्रक्टर शहाजी देवकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल अमित बरडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान सुरू असतान पोलीस उपनिरीक्षक सुरेश माने यांना माहिती मिळाली की, पाटेगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे स्थापलींग पॅनलचे प्रमुख शहाजी देवकर या.च्या वाघनळी येथील घरासमोर बाहेरगावाहून काही पहिलवान आले आहेत, अशी माहिती मिळाली.

यानंतर त्यांनी समक्ष त्या ठिकाणी पेालीस कर्मचारी यांच्यासह गेले असता तिथे एमएम 14 जीडी 5755 या टॅव्हल्स गाडीमध्ये 16 लोक सापडले हे सर्व पहिलवान पाटेगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदानासाठी 16 पहिलवान आणून मतदांरावर प्रभाव टाकण्यासाठी आणले म्हणून शहाजी देवकर विरूध्द भादवि कलम 171 व महाराष्ट्र पेालीस आधिनियम क्र. 68 सह 140 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून त्या सर्व बाडन्सर यांना अटक करण्यात आली आहे.

कर्जत (वार्ताहर)- तालुक्यातील पाटेगांव ग्रामपंचायतीच्या मतदानानंतर रात्री हॉटेलवर जेवण करीत असलेले

गव्हरमेट कॉन्ट्रक्टर शहाजी देवकर व त्यांचा मुलगा रोहित, भाऊ सतिष व ड्रायव्हर आणि सरंक्षणासाठी सोबत असलेल्या पोलीस कर्मचार्‍यांवर 70 ते 80 जणांच्या जमावाने शहाजी देवकर यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखांरावर दरोड्यासह दंगल व पोलीस कर्मचारी यांना मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सतिष देवकर यांनी कर्जत पोलीस स्टेशनला फिर्यादीत म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील पाटेगांव येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे व शहाजी देवकर यांचे दोन गट आहेत. या ठिकाणी दिवसभर शांततेने मतदान पार पडले.

मात्र मतदान संपल्यावर हॉटेल लक्ष्मीनंदन येथे शहाजी देवकर हे त्यांचा मुलगा रोहित, भाऊ सतिष तसेच सरंक्षणासाठी दिलेले पोलीस कर्मचारी विकी देहनकर व गाडीचा ड्रायव्हर बाबा सुरवसे हे जेवण करीत असताना अचानक तिथे कैलास शेवाळे त्यांचा मुलगा अ‍ॅड श्रीहर्ष शेवाळे, शरद शेवाळे, रवी शेवाळे, किरण शेवाळे बाळासाहेब शेवाळे यांच्यासह 70 ते 80 जणांचा जमाव आला व आमच्या विरोधात निवडणूक लढवता व पॅनल करता काय? असे म्हणून त्यांनी कोणाला काही समजण्यापुर्वीच शिवीगाळ करीत शहाजी देवकर आणि त्यांचा मुलगा रोहीत तसेच माझ्यावर व सोबत असलेले पोलीस कर्मचारी विकी देहनकर, गाडीचा ड्रायव्हर बाबा सुरवसे यांच्यावर हल्ला करीत जबर मारहाण केली.

यापैकी श्रीहर्ष शेवाळे यांच्या हातामध्ये गुप्तीसारखे शस्त्र होते. घटना स्थळी पोलीस आल्यावर काही हल्लेखोर पळून गेले. मात्र जाताना जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी जखमींना प्रथम उपजिल्हा रूग्णालय येथे नेले आणि तिथून नगर येथे उपचारासाठी पाठवले आहे. दरम्यान पोलीसांनी हल्लेखोरावंर भादवि कलम 395, 332, 325, 506 323 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या