Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून अपहरणाचा प्रयत्न

जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवून अपहरणाचा प्रयत्न

नाशिक | प्रतिनिधी

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या एका वरिष्ठ महिला अधिकार्‍यांचे बळजबरीने अपहरण करण्यात आल्याचा प्रकार आडगाव परिसरात १ जुलैला रात्री घडला. याप्रकरणी एका योगशिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो त्यांचा सातत्याने पाठलाग करत असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान संशयित फरार झाला आहे.

- Advertisement -

शिवराज पाटील (रा. नाशिक) असे संशयिताचे नाव असून तो सबंधीत महिला अधिकार्‍यांचा योगशिक्षक आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार जेवनानंतर शतपावलीसाठी महिला अधिकारी या बुधवारी (दि.१) रात्री साडेदहा वाजता घराबाहेर पडल्या होत्या. संशयित पाटील हा या महिला अधिकार्‍यांचा योग शिक्षक असून तो त्यांच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. यातूनच तो सातत्याने त्यांचा पाठलाग करत होता. बुधवारी रात्रीही चारचाकी वाहनातून पाठलाग करत रस्त्यावर थांबवलेल्या पाटील याने अधिकारी एकट्या असल्याचे पाहुण त्यांना जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले. तो त्यांना घेऊन जात असताना त्यांनी कडाडून विरोध केल्यानंतर तो त्यांना डीजीपीनगर भागात गाडीतून खाली उतरवून पळून गेला.

दरम्यान महिला अधिकार्‍यांनी पतीला या घटनेबाबत माहिती देऊन आडगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. त्यानुसार पाटील यावर आडगाव पोलीस ठाण्यात पाठलाग करणे व अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक इरफान शेख करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या