कुलकर्णी गार्डनजवळ एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

0
नाशिक : नाशिक जिल्ह्यात चोरट्यांचे चांगलेच फावले आहे. चोरटे आता थेट एटीएमलाच लक्ष करू लागले आहेत. काल(दि.३०) सटाणा शहरातील एसबीआयच्या एटीममधून २३ लाखांची रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच आज नाशिक शहरातील कुलकर्णी गार्डन परिसरातील एसबीआय शाखेचे एटीएम फोडण्याचा   अयशस्वी प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

दोन्ही संशयितांमध्ये एक वन कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची प्रथमदर्शी माहिती प्राप्त झाली आहे. सटाण्यातील एटीएम फोडले तेव्हा याठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे समोर आले होते.

या परिसरात एसबीआयचे एटीएम सुरु केले तेव्हापासून येथे एकही सुरक्षारक्षक नेमण्यात आला नसल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या कुलकर्णी गार्डन परिसरात एटीएमच्या सुरक्षेसाठी एकही सुरक्षा रक्षक नसल्याने बँकचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

काल मध्यरात्री ही घटना घडली असून आज सकाळी उघडकीस आली आहे. अद्याप याठिकाणी बँकेचा एक पदाधिकारीदेखील फिरकला नसल्याल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रे हलवत दोघांना ताबडतोब ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.  एसबीआय शाखेच्या एटीएमलाच दोन्ही ठिकाणी लक्ष करण्यात आल्यामुळे बँक प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज असून याठिकाणी सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

*