पैलवानावर जीवघेणा हल्ला : कट मारल्याचे कारण

0

अहमदनगर (प्रतिनिधी)– शहरातील पाईपलाईन रोडवरील यशोदानगर भाजी मार्केट येथे वाहनाला कट मारल्याच्या कारणाहून दोन गटात तुफान हाणामारी झाली. सिने स्टाईलला लाजवेल अशा पद्धतीने झालेल्या या मारहाणीत पैलवान लहू चावला व सुभाष फुंदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रविवारी दिनांक 13 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास चावला व यशोदानगर येथील एका तरुणाचे कट मारण्याच्या कारणाहून वाद झाले होते. मात्र, दोघांनी एकामेकांवर आरोप केलेे. हा वाद विकोप्याला गेल्यामुळे दोघांमध्ये चकमक झाली. यादरम्यान, यशोदानगर येथील तरुणाने फोन करून त्याच्या अन्य सहकार्‍यांना बोलावून घेतले. एकाच वेळी 15 ते 20 तरुणांनी चालवला यांच्यावर दगड, लाकडी दांडे व लोखंडी रॉडने हल्ला केला. हा सर्व प्रकार उपस्थित बघणार्‍यांच्या कॅमेर्‍यात कैद झाला आहे. धुळे येथे भरदिवसा एकाची हत्या करण्यात आली होती. अशा प्रकारचे हे भयानक दृश्य पहावयास मिळाले.

या घटनेत चावला व फुंदे ही दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एक तास चाललेल्या या हाणामारीत नागरिकांनी हस्तक्षेप केला नाही. या घटनेवरून शहरात गुंडाराज किती फोफावला आहे. याची प्रचिती नागरिकांनी अनुभवली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. दोन्ही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींच्या जबाबानुसार गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

*