Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

पब्जी गेम खेळायला दिला नाही म्हणून मित्रावरच कोयत्याने हल्ला

Share

पुणे | प्रतिनिधी

पब्जी खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही, म्हणून एकाने मित्रावरच कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना हडपसर येथील लोखंडी पुलाजवळ घडली.

सुनील माने (वय १९, रा. शिंगोट प्लाझा, हडपसर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हेमंतसिंग रजपुत (वय २४, रा. महम्मदवाडी) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हडपसर पोलिसांनी सनी पांडुरंग लोंढे (वय १८) आणि करण वानखेडे (वय २२, रा.डवरीनगर, लोखंडी पुलाजवळ, हडपसर) या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हेमंतसिंग आणि आरोपी सनी हे दोघे लोखंडीपुलाजवळ बोलत थांबले होते. त्यावेळी सनी लोंढे याने पब्जी गेम खेळण्यासाठी हेमंतसिंगकडे मोबाईल मागितला.

त्यावेळी फिर्यादीचा मित्र सुनील माने याने सनी लोंढे यास मोबाईल देत नाही, असे सांगितले. त्यामुळे सनी आणि सुनील या दोघांमध्ये बाचाबाची होऊन भांडणे झाली. त्या कारणावरुन सनीचा मित्र करण वानखेडे याने सुनील माने यास आता सोडायचे नाही, त्यास जीवे मारायचे असे म्हणत त्याच्याजवळील कोयता काढून सुनील माने याच्या डोक्‍यात घातला.

यामध्ये तो गंभीर जखमी झाला.  त्यानंतर हेमंतसिंग यांनी स्थानिक नागरीकांच्या मदतीने सुनीलला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले. तर हडपसर पोलिसांनी सनी आणि करण या दोघांना अटक केली. हडपसर पोलिस तपास करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!