Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : कृउबा सभापती शिवाजी चुंबळे यांच्याविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा

Share

पंचवटी |  वार्ताहर

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारच महिन्यांपूर्वी चुंबळे यांना ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा एका संचालकावर जातीवाचक शिवीगाळ केल्याने गुन्हा दाखल झाल्याने सभापती शिवाजी चुंबळे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र तुकाराम भोये यांनी दिलेल्या तक्रारीवरून चुंबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार (दि.१३) रोजी सकाळी ११ वाजता बाजार समितीची सर्वसाधारण सभा होती. दरम्यान, या सभेत रवींद्र भोये यांनी ऐनवेळेचा विषया बाबत बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांना विचारणा केली की, माझे नाव कोणत्याही पद्धतीच्या (दि.१४) सप्टेंबरच्या मिटिंग वरती विषय झालेला नसतानाही माझे सह्यांचे अधिकार काढून भाऊसाहेब खांडबहाले यांना दिले असून तो विषय आजच्या मिटिंगवर घेऊन त्यावर चर्चा करण्याची मागणी केली.

मात्र यावेळी चुंबळे यांनी तो माझा अधिकार असून मी ज्याला वाटेल त्याला देईल, तुला बोलण्याचा अधिकार नाही असे सांगत त्याकडे दुर्लक्ष करून पुढील विषय त्यांच्या मर्जीने संपविले.

साधारण दुपारी १२ वाजता मिटिंग संपल्यानंतर काही संचालक आणि कर्मचारी निघून गेल्यावर रवींद्र भोये आणि संचालक विश्वास नागरे, तुकाराम पेखळे, शंकर धनवटे, दिलीप थेटे हे सर्व चर्चा करत असतांना चुंबळे मिटिंग हॉल मध्येच थांबून राहिले.

त्याचवेळी काहीएक कारण नसतांना शिवाजी चुंबळे यांनी संचालक रवींद्र भोये यांना जातीवाचक शिवीगाळ करीत ऑफिस मधून बाहेर निघ, तुझा बेत बघायला कार्यलयाच्या बाहेर पोर उभे आहेत अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त अनिरुद्ध आढाव करीत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!