अँट्रॉसिटी आरोपांचे तृप्ती देसाईंकडून खंडन; सोशल मीडियावर क्लिप व्हायरल

0

पुणे (प्रतिनिधी): नगरच्या डॉ. मकासरे यांना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्याविरुद्ध पुणाच्या हिंजवाडी पोलीस स्थानकात अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर स्पष्टीकरण देण्यासाठी तृप्ती देसाई यांची सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे.

याऑडिओ क्लिपमध्ये, “त्यांनी डॉ. मकासरे यांनी केलेले सर्व आरोपांचे खंडन केले आहे. तसेच अँट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यामागे मोठे षड्यंत्र असून, त्यात मला आणि माझ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना फसवलं जात आहे.

मी कोणतीही जातीवाचक शिवीगाळ न करता पोलिसांनी अँट्रॉसिटी गुन्हा दाखल केलाच कसा? यामुळे पोलिसांच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.

अँट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे दलित जनतेने माझ्यामागे उभे राहिले पाहिजे”

 

LEAVE A REPLY

*