सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारत अवघ्या १२ मिनिटात एटीएम फोडून चोरटे पसार; पिंपळगाव बसवंत येथील घटना

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर

निफाड तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत येथे चोरट्यांनी आज पहाटेच्या सुमारास एटीएम फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफूलीवर युको बॅकेचे एटीएम आहे.  पहाटे चार वाजेच्या सुमारास बॅकेचे एटीएम फोडण्यासाठी तिघा चोरट्यांनी प्रवेश केला.

आधी काळ्या रंगाचा स्प्रे चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या कॅमेरयावर मारला. त्यानंतर गॅसकटरच्या सहाय्याने मशीन फोडत त्यात असलेली 25 हजार 400 रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला.

हा सर्व प्रकार अवघ्या १२ मिनिटाच्या कालावधीत घडल्याची माहितील पोलिसांनी दिली. याच चौफूलीवर फोडलेल्या एटीएमपासून काही फुटांवर अन्य तीन बँकांचे एटीएम आहे.

गेल्या सहा महिन्यापूर्वीच एटीएमजवळ सुरक्षारक्षण संबंधित बँकेने नेमावा अशा नोटीसा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव धाडल्या होत्या. मात्र, याठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी संधीत साधत एटीएम फोडून रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

याप्रकणी बॅक व्यवस्थापक रविकिरण त्रिकोटी यांनी फिर्याद दाखल केली असून पिंपळगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.