Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मखमलाबाद गावात SBI चे ATM फोडले

Share

पंचवटी | वार्ताहर

जेलरोड परिसरात काल (दि. २१) एटीएम फोडल्याची घटना ताजी असतानाच आज मखमलाबाद गावातील एसबीआयचे एटीएम फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३१ ते ३२ लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.  घटनास्थळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, मखमलाबाद गावात स्टेट बँकेचे एटीएम आहे. गॅस कटरच्या सहाय्याने पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एटीएम फोडले. एटीएममधून जवळपास ३१ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम चोरून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्यासह म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासकार्य सुरु आहे.

कालच नाशिकरोड परिसरातील जेलरोडला गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून रोकड लांबवल्याची घटना घडली होती. या घटनेशी मखमलाबाद येथील घटनेचे साध्यर्म्य असल्याचे बोलले जात असून पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!