खातेदार सभासदांसाठी ‘श्रीमंत’कडून ‘एटीम’चे वितरण

0
डुबेरे | येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेची व्याप्ती जिल्हाभर झाली आहे. डुबेरे मुख्य शाखेसह सिन्नर, नाशिक रोड, ठाणगाव, घोटी, साकुर फाटा असा शाखा विस्तार झालेला आहे.

नोटबंदीनंतर राष्ट्रीयकृत बँकेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी व आपल्या ग्राहकांना सुविधा देण्यासाठी संचालक मंडळाने डिजिटल होण्याचा निर्णय घेतला. संस्थेच्या सर्व शाखा इंटरनेटने जोडलेल्या असून यापूर्वी कोअर बँकिंग, नेट बँकिंग, एनएफटी, वीजबिल भरणा या सुविधा संस्थेकडून ग्राहकांना देण्यात येत आहे.

संस्थापक चेअरमन नारायणशेठ वाजे यांच्या नेतृत्वाखाली व संचालक मंडळाच्या पाठबळामुळे आणि प्रशिक्षीत कर्मचारी यांच्यामुळे संस्था झपाट्याने वाढत आहे.

संस्थेचे रोप्यमहोत्सवी वर्षे सुरु आहे. त्यामुळे विविध कार्यक्रम संस्थेने हाती घेतलेले आहे. आयआयसी बँकेच्या सहयोगातून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एटीम सुविधा सुरु करण्यात आली आहे.

आज (दि.6) पतसंस्थेचे माजी व्हा. चेअरमन तथा संचालक रामनाथ वामने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला व पाहिले ग्राहक म्हणून एटीम कार्डचे चेअरमन नारायण वाजे यांच्या हस्ते त्यांना वितरण करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात एक हजार सभासदांना एटीम कार्डचे वाटप करण्यात येईल. कार्यकारी संचालक भिमराव चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, शंकरराव वामने, काशिनाथ वाजे, आनंदा सहाणे, अशोक गवळी, शरद माळी, भाऊराव वाजे, अयुब शेख आदींसह पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*