Type to search

आठवले भाजपाचे प्रवक्ते

Featured सार्वमत

आठवले भाजपाचे प्रवक्ते

Share

नगर टाइम्स,

अशोक गायकवाडांची टिंगलटवाळी

अहमदनगर (प्रतिनिधी)- आंबेडकरी जनता रामदास आठवले व प्रकाश आंबेकडकरांना वैतागली आहे. आठवले हे भावनिक राजकारण करत आहे. आंबेडकरी जनतेचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहे. दिल्लीत राज्यघटनेच्या प्रति जाळण्यात आल्या. याबाबत आठवले यांनी कोणतीच भूमिका घेतली नाही. 2019 मध्ये भाजपाचे सरकार येणार असल्याचे ते सर्वत्र सांगत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ते भाजपाचे प्रवक्ते झाल्याची टिंगलटवाळी युनायटेड आरपीआय मंडळाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

युनायटेड रिपब्लीकन पक्षाच्या पदाधिकार्‍यांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजेंद्र साठे, नाना पाटोळे, वैभव कांबळे, सोमनाथ साठे, विनोद भिंगारदिवे, मंच्छिद्र नगरे, सचिन नगरे, संतोष शिंदे, सचिन काकडे, सुरज कांबळे, रावसाहेब शिंदे, रूपशे शिंदे यांच्यास पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थितीत होते. पुढे बोलतांना गायकवाड म्हणाले, रामदास आठवले यांच्या शहरात काल मेळावा आयोजित केला होता. मेळाव्याला किती जनता उपस्थित होती, हे सर्व नगरकरांनी पाहिले. मात्र युनायटेड रिपब्लीकन पक्षात अनेक आरपीआयचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रवेश करत आहे.

विविध समाज घटक, तरूण कार्यकर्ते यांना पक्षात घेऊन त्यांना नेतृव करण्याची संधील दिली जाणार आहे. बी.जी.पी व आरएसएस. च्या विरोधात तरूणाची अळी तयार करून येणार्‍या निवडणूकीत तरूणा उमेदवार उभे केले जाणार आहे. तसेच येणार्‍या महापालिकेच्या निवडणूकीत समविचारी पक्षासोबत युती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरपीआयच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जया गायकवाड यांनी आरपीआयच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. दरम्यान त्यांनी युनायटेड रिपब्लीकन पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

कार्यकारणी अशी – तनासेनाई ननावरे (राष्ट्रीय अध्यक्ष) अशोक गायकवाड (अध्यक्ष) बाळासाहेब निर्मळे (ठाणे), किशोर घाटे (नाशिक) उत्तम नवघरे (वाशिम), प्रशांत शांताराम नांदगांवकर, नितीन मधुकर मोरे, रमाबाई भालेराव, अ‍ॅड. सादिक शिलेदार, उत्तमराव गायकवाड, आनंद निरभवणे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!