माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना लवकरच डिस्चार्ज

0
नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असून त्यांना लवकरच दवाखान्यातून सुट्टी देण्यात येईल अशी माहिती एम्स रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

वाजपेयी यांना अँटिबायोटिक्‍स दिले जात असून, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचीही माहिती मिळाली आहे.

वाजपेयी ठराविक तपासण्या करायच्या बाकी आहेत. त्यांना अतिदक्षता विभागातून सामान्य कक्षात हलविण्यात आले आहे.

वाजपेयी हे उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती आज दुपारच्या एम्स हॉस्पिटल कडून देण्यात आलेल्या बुलेटीनमध्ये देण्यात आली आहे.

अनेक वरिष्ठ नेत्यांनी वाजपेयी यांच्या तब्बेतीची विचारपूस केली असून काही नेत्यांनी आज एम्समध्ये भेट देऊन तब्बेतीबाबत माहिती घेतली.

LEAVE A REPLY

*