…म्हणून अटलजींनी रचली ‘मौत से ठन गई’ कविता

0
नवी दिल्ली |  माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावली असून अनेक  नेत्यांच्या रांगा एम्स रुग्णालयात लागल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांना नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गेल्या काही तासापासून त्यांना जीवरक्षक प्रणालीवर आयसीयुत ठेवण्यात आले आहे. अटलजींनी त्यांच्या जीवनातही वेगवेगळ्या विषयांना अनुसरून कविता रचल्या होत्या.

त्यांच्या अनेक कविता गाजल्या. त्यांच्या कवितांमध्ये एक संदेश होता. १९८८ साली जेव्हा वाजपेयी किडनीच्या आजारावर उपचारासाठी अमेरिकेत गेले होते तेव्हा धर्मवीर भारती यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी मृत्यूला हरविण्यासाठी रचलेल्या काव्यपंक्तीना या पत्रात रचले होते. या कवितेचे बोल होते ‘मौत से ठन गई’…

आज कुणाचाही विश्वास बसणार नाही १९८८ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वतः अटलबिहारी वाजपेयी यांना उपचारासाठी अमेरिकेत पाठवले होते. त्यांच्या उपचारासाठीची सर्व काळजी राजीव गांधी यांनी घेतली होती.

धर्मवीर भारती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, डॉक्टरांनी सर्जरीचा सल्ला दिला आहे. त्यानंतर झोप येत नव्हती. त्याच वेळी मनात होत असलेल्या विचारांच्या द्वंद्वला याच कवितेने जन्म दिला होता.

राजीव गांधी यांनी संयुक्त राष्ट्रात पाठ्वेलेल्या डेलिगेशनमध्ये अटलजींच्या नावाचा समावेश केला होता. त्यामुळे अटलजी त्यांच्या किडनीविकाराचा उपचार करू शकतील. त्यानंतर अटलजी नेहमीच राजीव गांधी यांच्या महानतेचा उल्लेख  करायचे की राजीव गांधी यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे!

ठन गई! 
मौत से ठन गई! 

जूझने का मेरा इरादा न था, 
मोड़ पर मिलेंगे इसका वादा न था, 

रास्ता रोक कर वह खड़ी हो गई, 
यूं लगा जिंदगी से बड़ी हो गई। 

मौत की उमर क्या है? दो पल भी नहीं, 
जिंदगी सिलसिला, आज कल की नहीं। 

मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, 
लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं? 

तू दबे पांव, चोरी-छिपे से न आ, 
सामने वार कर फिर मुझे आजमा। 

मौत से बेखबर, जिंदगी का सफ़र, 
शाम हर सुरमई, रात बंसी का स्वर। 

बात ऐसी नहीं कि कोई ग़म ही नहीं, 
दर्द अपने-पराए कुछ कम भी नहीं। 

प्यार इतना परायों से मुझको मिला, 
न अपनों से बाक़ी हैं कोई गिला। 

हर चुनौती से दो हाथ मैंने किए, 
आंधियों में जलाए हैं बुझते दिए। 

आज झकझोरता तेज़ तूफ़ान है, 
नाव भंवरों की बांहों में मेहमान है। 

पार पाने का क़ायम मगर हौसला, 
देख तेवर तूफ़ां का, तेवरी तन गई। 

मौत से ठन गई। …

LEAVE A REPLY

*