माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

1
नवी दिल्ली, ता. १६ : भारताचे माजी पंतप्रधान आणि संवेदनशील कवी, लेखक भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी आज नवी दिल्ली येथील एम्स रूग्णालयात शेवटचा श्वास घेतला. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते किडनी विकार आणि स्मृतीभ्रंश आजाराने ते ग्रस्त होते.

११ जूनपासून त्यांच्यावर येथे उपचार सुरू होते. बुधवारी त्यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार, भाजपा आणि देशातील विविध नेत्यांनी त्यांच्या भेटीसाठी एम्समध्ये गर्दी केली होती.

एम्स रुग्णालयाकडून सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सादर करण्यात आलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये वाजपेयींच्या निधनाची वार्ता देण्यात आली.

अटल बिहारी वाजपेयी यांची कारकीर्द

अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ मध्ये झाला. त्यांचे वडील पंडित कृष्ण बिहारी वाजपेयी हे उत्तर प्रदेशमधील आग्रा जनपदच्या प्राचीन स्थान बटेश्वरमध्ये ग्वालियर घराण्यात अध्यापक होते.  तिथेच अटलजीनचा जन्म झाला. कृष्णा वाजपेयी असे त्यांच्या आईचे नाव होते. याचदरम्यान, महात्मा रामचन्द्र वीर यांनी रचलेल्या अमर कृति ‘विजय पताका’ वाचून अटलजी यांच्या जीवनाची दिशाच बदलली.

अटलजी यांनी पदवी बीएचे शिक्षण ग्वालियर येथील विक्टोरिया महाविद्यालयातून घेतले. (आताचे लक्ष्मीबाई कॉलेज) विद्यार्थी जीवनात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक बनले.

यादरम्यान, अनेक वाद-विवाद स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. कानपूरमध्ये के.डी.ए.वी. कॉलेज मध्ये राज्याशास्र या विषयात त्यांनी पहिल्या श्रेणीत पदव्यत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला.

त्यानंतर त्यांच्या वडिलांसोबत कानपुरमध्ये  एल.एल.बी. चा अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. मात्र त्यानंतर अभ्यासक्रम अर्धवट सोडून त्यांनी पूर्णवेळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामकाजाची धुरा सांभाळली.

त्यानंतर डॉ॰ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणाचे धडे त्यांनी घेतले. याच वेळी त्यांनी राष्ट्रधर्म, दैनिक स्वदेश आणि वीर अर्जुन सारख्या वर्तमानपत्रात त्यांनी लेख लिहिले.

हिंदी साहित्यातील नामवंत कवींमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी होते. त्यांच्या अनेक कविता आजही साहित्यात शिकवल्या जातात. १६ मे ते १ जून १९९६ आणि १९ मार्च १९९८ से २२ मे २००४ या काळात ते भारताचे पंतप्रधान होते. एक कवी पत्रकार आणि प्रखर वक्ता म्हणून त्यांना ओळखले जाई.

भारतीय जनसंघाची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जनसंघाच्या स्थापनेतील महापुरुषांच्या यादीत त्यांचा समावेश होता.

भारतीय जनसंघाचे १९६८ से १९७३ पर्यंत ते अध्यक्ष होते. सर्वात जास्त काळ भारतीय राजकारणात सक्रीय सहभागी होते.  त्यांनी जास्तीत जास्त वेळ राष्ट्रधर्म, वीर अर्जुन आदि राष्ट्रीय भावनांना प्रेरित करणाऱ्या स्तंभ तसेच वर्तमानपत्रांतून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.

त्यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकंच्या रुपात घालवले. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. वाजपेयी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) या सरकारचे पहिले पंतप्रधान होते.

या काळात त्यांनी पाच वर्षे कुठलीही समस्या न ओढवून घेता पूर्ण केले. त्यांनी २४ पक्षांना सोबत घेऊन सरकार बनवले होते. त्यावेळी जवळपास ८१ मंत्री होते. याकाळात वाजपेयी सरकारच्या काळात  कुठल्याही पक्षाने नाराजी व्यक्त केली नव्हती.

अटलबिहारी वाजपेयी यांचा राजकीय प्रवास

आधीच्या भारतीय जनसंघ आणि आताच्या भाजपच्या स्थापनेत अटलजींचे नाव अग्रस्थानी होते. १९६८ ते १९७३ या काळात ते जनसंघाचे अध्यक्षदेखील होते.

सन् १९५५ मध्ये  पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली. यात त्यांना विजय मिळवता आला नव्हता. त्यानंतर त्यांनी १९५७ मध्ये उत्तरप्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील बलरामपुरमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली.

त्यात त्यांना यश आले आणि पहिल्यांदाच ते जनसंघाचे खासदारमधून लोकसभेत पोहोचले. सन् १९५७ ते १९७७ पर्यंत जनता पार्टीच्या स्थापणेपर्यंत ते लागोपाठ २० वर्षे जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते होते.

मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते १९७७ ते १९७९ पर्यंत परराष्ट्र मंत्री होते. तेव्हाच त्यांनी भारताची नवी ओळख जगात निर्माण केली होती.

१९८० साली भारतीय जनता पार्टी मध्ये नाराज होऊन बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टी स्थापनेसाठी मदत केली.

६ अप्रैल १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यापदाची धुरादेखील त्यांनी सांभाळली. दोन वेळा ते राज्यसभेवर निवडणून गेले.

त्यानंतर त्यांनी १९९७ मध्ये प्रधानमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. १९ एप्रिल १९९८ साली त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 

२००४ मध्ये त्यांचा कार्यकाल मोठ्या संकटात पूर्ण केले. त्यानंतर लोकसभा निवडणुका झाल्या. त्यात त्यांनी भाजपच्या नेतृत्व असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या रुपात निवडणुका लढवल्या.

त्यात त्यांनी शायनिंग इंडियाचा नारा दिला. त्यांच्या आघाडीला बहुमत मिळाले नाही. त्यानंतर कॉंग्रेस सरकार सत्तेवर आले.

पोखरणची महात्वाकांक्षी मोहीम

अटलजींचे सरकार असताना ११ आणि १३ मे १९९८ मध्ये पाच भूमिगत अणुचाचणी परीक्षण करण्यात आले. पाच वेळा परीक्षण विस्फोट करून भारताला अणुउर्जा संपन्न देश घोषित करण्यात आले.

भारताच्या या पावलामुळे भारताला त्यापासून भारत बड्या देशांच्या यादीत जाऊन बसला होता. हे सर्व खूप गोपनीयता ठेवून करण्यात आले होते.

या मोहिमेद्वारे पाश्यात्य देशांना याबाबत साधी माहितीदेखील नव्हती. या घटनेनंतर भारतावर अनेक निर्बंध लावण्यात आले होते. त्यानंतर वाजपेयी सरकारने या सर्व घटनांना सामोरे जात आर्थिक विकासाची उंची गाठली.

भारत पाक संबंध सुधारण्यात यश 

१९ फेब्रुवारी १९९९ साली सदा-ए-सरहद नावाने दिल्ली ते लाहोर (पाकिस्तान) पर्यंत बससेवा सुरु केली होती. या बसमधून पाकिस्तानमध्ये जाणारी पहिली व्यक्ती किस्तानच्या लाहोरमध्ये गेली होती. नवाज शरीफ यांची भेट घेत भारत पाक संबंध सुधारण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी एक पाउल पुढे टाकले होते.

कारगिल विजय

भारत पाक चांगले संबंध होण्यासाठी प्रयत्न झाल्यानंतर तत्कालीन लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांच्या सेनेने पाकिस्तानी सेना आणि दहशतवाद्यांना सोबत घेऊन भारतावर चाल करून आले. यावेळी भारताच्या अनेक चौक्यांवर त्यांनी कब्जा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताने चोख प्रत्युत्तर देत कब्जा करत हा परिसर पुन्हा ताब्यात घेतला. त्यानंतर भारत पाक संबंध पुन्हा बिघडले होते.

वाजपेयी सरकार काळातील महत्वपूर्ण घडामोडी

 • शंभर वर्षे जुना कावेरी पाणी वाटपाचा वाद मिटवला.
 • योग्य व्यवस्थापणासाठी कार्यदलाची स्थापना. सॉफ्टवेअर विकासासाठी सूचना आणि प्रौद्योगिक कार्यादालाची स्थापना, विद्युतीकरणात गती आणण्यासाठी केंद्रीय विद्युत नियामक आयोगाची स्थापना केली.
 • राष्ट्रीय, राज्य मार्ग आणि विमानतळांचा विकास, नवीन दूरसंचार धोरण, कोकण रेल्वेची सुरवात करून प्रभावी अंमलबजावणी केली.
 • राष्ट्रीय सुरक्षा समिति, आर्थिक सल्लागार समिती व व्यापार आणि उद्योग समिती गठीत केली.
 • आवश्यक्त ग्राहक साधन सामग्री आणि किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी देशातील मुख्यमंत्र्यांचे संमेलन बोलावले होते.
 • उड़ीसामध्ये सर्वाधिक गरीब क्षेत्र आहे तेथे सात सुत्रीय गरिबी निर्मुलन कार्यक्रम सुरु केला.
 • निवारा उभारण्यासाठी प्रोत्साहणासाठी अर्बन सिलिंग अक्ट समाप्त केला.
 • ग्रामीण रोजगार सृजन आणि विदेशात भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी विमा योजना सुरु केली.

अटलजी एक कवीच्या भूमिकेत

राजकारणी अटल बिहारी वाजपेयी एक कवीदेखील होते. मेरी इक्यावन कविताएँ हा अटलबिहारी वाजपेयी यांचा काव्यसंग्रह आजही प्रसिद्ध आहे.

वाजपेयीना काव्य रचण्याची शैली वडिलोपार्जित मिळाली. त्यांचे वडील कृष्ण कुमार वाजपेयी एकेकाळचे कवी होऊन गेले होते. परिवारातील वातावरण काव्यात्मक असल्यामुळे त्यांच्या काव्याचे गुण अवतरले होते.

त्यांची सर्वप्रथम कविता ताजमहाल होती. ‘एक शहंशाह ने बनवा के हसीं ताजमहल, हम गरीबों की मोहब्बत का उड़ाया है मजाक’ यासोबत त्यांनी ताजमहालच्या कारागीरांच्या शोषणावर वास्तव मांडले होते.

जगप्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंग यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांना संगीतबद्ध केले होते.

प्रमुख रचना

 • मृत्यु या हत्या
 • अमर बलिदान (लोकसभेतील अटलजींच्या वक्तव्यांचा संग्रह)
 • कैदी कविराय की कुण्डलियाँ
 • संसद में तीन दशक
 • अमर आग है
 • कुछ लेख: कुछ भाषण
 • सेक्युलर वाद
 • राजनीति की रपटीली राहें
 • बिन्दु बिन्दु विचार, इत्यादि।
 • मेरी इक्यावन कविताएँ

त्यांना मिळालेले पुरस्कार 

 • १९९२: पद्म विभूषण
 • १९९३: डी लिट (कानपुर विश्वविद्यालय)
 • १९९४: लोकमान्य तिलक पुरस्कार
 • १९९४: श्रेष्ठ खासदार पुरस्कार
 • १९९४: भारत रत्न पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
 • २०१५ : डी लिट (मध्य प्रदेश भोज मुक्त विश्वविद्यालय)
 • २०१५ : ‘फ्रेंड्स ऑफ बांग्लादेश लिबरेशन वार अवॉर्ड’, (बांग्लादेश सरकार द्वारा प्रदत्त)
 • २०१५ : भारतरत्न से सम्मानित

1 COMMENT

 1. भारताविषयी संपूर्ण जगात प्रचंड आदर निर्माण केलेले एक पंतप्रधान. अटलजींच्या रूपाने भारतात देवानेच जन्म घेतला आणि आपल्याला देवत्वाची, ममत्वाची आणि प्रेमाची शिकवण दिली. एक महान तपस्वी हरपला. अटलजी, पुन्हा या भूमीतच जन्म घ्या. आपणास साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली !!

LEAVE A REPLY

*