मोसमी पाऊस अखेर नाशकात दाखल; पण ढेकळं भिजल्यावरच करा पेरणी

0

नाशिक, ता. २२ : गेले काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज मोसमी पावसाचे नाशिकमध्ये आगमन झाले.

आज सकाळी त्र्यंबकेश्वर आणि त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास नाशिक शहरात मोसमी पावसाचा शिडकावा झाला.

मोसमी पाऊस नाशिकमध्ये दाखल झाला असला, तरी उत्तर महाराष्ट्र व्यापण्यास त्याला आणखी दोन-तीन दिवस लागण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे. तर हवामानखात्याने मध्यमहाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात मोसमी पावसासाठी अनुकुल स्थिती असून येत्या ५ ते ६ दिवसात तो सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

 मॉन्सून अजून पूर्णपणे सक्रीय झाला नसून जुलैमध्ये तो सक्रिय होईल आणि पावसाचे प्रमाण वाढेल अशी माहिती भौतिकशास्त्रज्ञ आणि हवामान अभ्यासक किरणकुमारे जोहरे यांनी दिली.

श्री जोहरे म्हणाले की मॉन्सून दाखल झाला असला तरी शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. जोपर्यंत वाफसा येत नाही किंवा जमिनीतील ढेकळं भिजत नाही, तोपर्यंत पेरणी करणे योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान पूर्वहंगामी पाऊस पडतेवेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहतात. तसेच पाऊस पडल्यानंतर आकाश पुन्हा निरभ्र होते. मात्र मोसमी पाऊस पडतेवेळी दिवसभर आभाळ येते. वीजांचा कडकडात होत नाही.

काल मोसमी पाऊस विदर्भ आणि छत्तीसगड पर्यंत दाखल झाला असून लवकरच तो मराठावाडा, मध्यमहाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

LEAVE A REPLY

*